Lonavala Rains | लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद ! गेल्या 24 तासांत तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद

Rain

लोणावळा : Lonavala Rains | लोणावळा हे पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. महाराष्ट्रासह देशभरातून पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. सर्वाधिक पुणे, मुंबई याठिकाणचे पर्यटक हमखास येतात. सध्या लोणावळ्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मागील चोवीस तासात लोणावळ्यात २७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसाने लोणावळ्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत.

आतापर्यंत लोणावळ्यात २६०१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत १०१ मिलिमीटरने जास्त आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत २५०१ मिलीमीटर पाऊस झाला होता. (Lonavala Rains)

गेल्या चोवीस तासात लोणावळ्यात ढगफुटी (Cloudburst in Lonavala) सदृश पाऊस झाला आहे. २४ तासात तब्ब्ल २७५ मिलीमीटर पाऊस कोसळला आहे. भुशी धरण (Bhushi Dam) यासह इंद्रायणी नदी (Indrayani River) ओसंडून वाहू लागली आहे. काही ठिकाणी रस्त्याला देखील नदीचं स्वरूप आलं आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Puja Khedkar | UPSC ने गुन्हा दाखल करताच पूजा खेडकर नॉट रिचेबल; पुणे पोलिसांनी समन्स बजावूनही उपस्थित नाहीत

Pune Crime News | आंदेकर टोळीतील गुंडांकडून तरुणावर हल्ला; एकास अटक

Sassoon Hospital | धक्कादायक! ससून रुग्णालयातील डॉक्टरांकडून बेवारस रुग्णासोबत अमानवी कृत्य