Lonavala Rains | लोणावळ्यात गेल्या चोवीस तासात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद; गेल्या 24 तासात 216 मिलिमीटर पाऊस
लोणावळा : Lonavala Rains | पर्यटकांचं आकर्षण केंद्र असलेल्या लोणावळ्यात गेल्या २४ तासात २१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात पावसाने जोरदार बॅटिंग केली. महाराष्ट्रातील लोणावळा हे पर्यटकांसाठी पर्वणी ठरलेलं शहर आहे. लोणावळ्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे लोणावळ्यात आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे.
लोणावळ्यात गेल्या २४ तासात २१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जो यावर्षीचा रेकॉर्डब्रेक पाऊस आहे. आतापर्यंत लोणावळ्यात १ हजार ४८५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत १ हजार १९० मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक पाऊस कोसळला आहे. धुवाधार पाऊस झाल्याने लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. (Lonavala Rains)
वाहत्या धबधब्यात भिजण्याचा तसेच धुक्यात हरवून जात निसर्गाच्या सुंदरतेचा आनंद लुटताना पर्यटक दिसत आहेत.
भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट इथे आधीच गर्दी असते.
पर्यटकांनी स्वतःची व दुसऱ्याची काळजी घेऊन पर्यटन करावे, असे आवाहन लोणावळा पोलीस वारंवार करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड