Loni Kalbhor Pune Crime News | पुणे: अल्पवयीन मुलीबरोबर ‘स्नॅपचॅट’वर मैत्री करुन अश्लिल फोटो पाठविण्यास पाडले भाग; शरीर सुखाची मागणी

न

पुणे : Loni Kalbhor Pune Crime News | अल्पवयीन मुलीबरोबर स्नॅपचॅट अ‍ॅप्लीकेशनवर मैत्री करुन तिच्याशी अश्लिल चॅटिंग केले. तिला ब्लॅकमेक करुन तिला नग्न फोटा पाठविण्यास सांगितले. अश्लिल चॅटिंग करुन फोटो व अश्लिल व्हिडिओ पाठवून तिला शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत या अल्पवयीन मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलिसांकडे (Loni Kalbhor Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चार पैकी तीन मुलांना अटक केली आहे. हा प्रकार १ ते २५ नोव्हेबर दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन आहे हे माहिती असताना ती वापरत असलेल्या स्नॅपचॅट अ‍ॅप्लीकेशनवर मैत्री केली. तिच्याशी जवळीक साधण्यासाठी सातत्याने स्नॅपचॅटवर अश्लिल चॅटिंग करुन तिला स्नॅपचॅट अ‍ॅप्लीकेश्नवर कोणा कोणासोबत बोलतेस हे घरी सांगण्याची धमकी दिली. तिला ब्लॅकमेल करुन नग्न फोटो पाठविण्यास भाग पाडले. तसेच स्नॅपचॅटवर अश्लिल चॅटिंग करुन, फोटो व अश्लिल व्हिडिओ पाठवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. याची माहिती मिळाल्यावर आईने पोलिसांकडे धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक खोसे तपास करीत आहेत. (Loni Kalbhor Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी

You may have missed