Loni Kalbhor Pune Police News | कर्ण कर्कश्य आवाजाचे सायलेन्सर लावलेल्या बुलेटवर कारवाई; 22 बुलेटचे सायलेन्सर काढले (Video)

पुणे : Loni Kalbhor Pune Police News | शहरात कर्ण कर्कश्य आवाजाचे सायलेन्सर लावून लोकांना त्रास देणार्या वाहनचालकांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी मोहित उघडली. त्यात २२ बुलेट ताब्यात घेण्यात आल्या असून त्यांचे सायलेन्सर काढून टाकण्यात आले़ त्यांच्याकडून २५ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.
https://www.instagram.com/p/DGU6BOtpqN1
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुलेट चालक हे सायलेन्सर बदलून त्यामधून फटाके फोडत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस ठाण्याच्या स्तरावर ४ पोलीस अधिकारी आणि १५ पोलीस अंमलदार यांची पथके तयार केली. त्यांनी लोणी काळभोर परिसरातमधील वेगवेगळ्या भागात नेमण्यात आले. मॉडिफाइड सायलेन्सर, विना नंबरप्लेट अशा एकूण २२ बुलेट गाड्या ताब्यात घेण्यात आला.
या गांड्यांचे मॉडिफाइड सायलेन्सर काढून घेण्यात आले. तसेच वाहतूक अंमलदार यांच्यामार्फत त्यांच्यावर २५ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या वाहनांचे मुळे सायलेन्सर बसवून तसेच ज्यांना गांड्यांना नंबर प्लेट नव्हत्या, त्यांच्यावर कारवाई करुन त्यांना नंबर प्लेट बसवून ही वाहने वाहनमालकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली.
शहरात विविध ठिकाणी रात्रीअपरात्री मोठ्याने आवाज करीत अनेक मोटारस्वार गाड्या फिरवत विकृत आनंद घेत असताना दिसून येते़ अशा वाहनांवरही शहरातील पोलिसांनी कारवाई करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (Loni Kalbhor Pune Police News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण