Lonikand Pune Crime News | गावठी दारु विक्रेत्याला केले दीड वर्षासाठी तडीपार

Tadipar-pune Police

पुणे : Lonikand Pune Crime News | वारंवार कारवाई करुन गावठी हातभट्टी दारु विक्री करणारा व परिसरात दहशत निर्माण करणार्‍या गावठी दारु विक्रेत्याला पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar) यांनी दीड वर्षाकरीता तडीपार केले आहे.

शामकांत विष्णु सातव (वय ३९, रा. आव्हाळवाडी रोड, डोमखेल वस्ती, वाघोली) असे तडीपार केलेल्याचे नाव आहे. शामकांत सातव हा आव्हाळवाडी, वाघोली तसेच आसपासच्या भागात दहशत निर्माण करुन लोकांना वारंवार त्रास देत होता. बेकादेशीररित्या गावठी हातभट्टीची दारु विक्री करुन लोकांचे जीवन धोक्यात आणत होता. (Lonikand Pune Crime News)

त्याच्यावर वारंवार कारवाई केल्यानंतरही तो गावठी दारु विक्री करत असत. सराईत गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा, या उद्देशाने सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे (ACP Pranjali Sonawane), वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड (PI Pandit Rejitwad) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे (API Ravindra Godse), पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय झुरुंगे (PSI Dattatraya Zurunge), पोलीस अंमलदार प्रशांत कापुरे, सागर कडु, शुभम सातव यांनी अभिलेख तपासून शामकांत सातव याला तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्याकडे पाठविला होता. शामकांत सातव याला पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून दीड वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sinhagad Road Flyover | अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले – ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले असे आमचे सरकार’

Hadapsar Pune News | हडपसर: बहुचर्चित भारतातील सर्वात पहिल्या प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्र्याचा हस्ते होणार उद्घाटन !

Pune ACB Trap Case | महिला सहायक सरकारी वकिल एसीबीच्या जाळ्यात; जप्त कार परत मिळवून देण्यासाठी मागितली लाच

Sri Sri Ravi Shankar | वैचारिक अभिव्यक्ती आणि विविधता हेच भारताला भारत बनवते ! – गुरुदेव श्री श्री रविशंकर

You may have missed