Lonikand Pune Crime News | पत्नी नांदायला येत नसल्याने पतीची गळफास घेऊन आत्महत्या; चार महिन्यांपूर्वी झाले होते लग्न
पुणे : Lonikand Pune Crime News | चार महिन्यांपूर्वी लग्न झाले असताना माहेरी गेलेली पत्नी नांदायला येत नसल्याने तसेच सासरकडच्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने पतीने गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या (Suicide Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे.
रियाज मोमंद मुल्ला (वय २९, रा. एस टी कॉलनी, वाघोली) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. हा प्रकार त्याच्या राहत्या घरी शनिवारी सकाळी घडला.
याबाबत शमीन मोहमंद मुल्ला (वय ५४, रा. एस टी कॉलनी, वाघोली – Wagholi) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सासरे मुजीब बाबु शेख, सासू शाहीर शेख, आज्जे सासरे चाँद मौल्ला शेख, पत्नी सुफी रियाज शेख, मेव्हणी सना उस्मान शेख, मेहरुन शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Lonikand Police Station)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाज मुल्ला हा कॅबचालक होता. त्याचे एप्रिल २०२४ मध्ये सुफी यांच्याबरोबर विवाह झाला होता. लग्नानंतर सासरकडील लोकांनी रियाज याला वेळोवळी शिवीगाळ दमदाटी केली. त्यांची पत्नी माहेरी गेली ती परत नांदायला आली नाही. तिने नांदायला यावे, यासाठी रियाज गेला असताना त्याला अपमानास्पद वागणूक दिली.
या सततच्या त्रासाला कंटाळून रियाज याने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.
लोणीकंद पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Lonikand Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य