Lonikand Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा केला प्रयत्न

Pune Crime News | Bullet driver and his companions beat up a senior citizen with sticks for telling him not to honk the horn, incident in Maharshi Nagar

पुणे : Lonikand Pune Crime News | दीड महिन्यांपूर्वी साखरपुड्याच्या कार्यक्रमात झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. (Attempt To Murder)

याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) तिघांना अटक केली आहे. ऋषिकेश रमेश झेंडे (वय २३, रा. वाघोली), अमन मुबारक शेख (वय २३), मनिष अनिल उबाळे (वय २०, तिघे रा. वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत सौरभ संतोष तांबे (वय २४, रा. पिंपळे जगताप, ता. शिरुर) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार लोणीकंदमधील भारत पेट्रोल पंप समोर आणि मैनिका हॉटेल समोर शनिवारी रात्री ९ वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र अभिषेक सुधाकर मुजमुले व श्रीकांत हनुमंत आजबे यांच्यासह बुलेटवरुन जात होते. तेव्हा आरोपीही बुलेटवरुन आले.

त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन फिर्यादी व त्यांच्या मित्रांना पुढे जाण्यापासून अटकाव केला. ऋषिकेश झेंडे याने लोखंडी रॉडने फिर्यादीचा मित्र अभिषेक मुजमुले याचे डोळ्याला गंभीर दुखापत केली. झेंडे याच्या मोटारसायकलवरील साथीदाराने फिर्यादीच्या हातावर व डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर दुखापत करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Shivaji Nagar Assembly Election 2024 | “मनीष आनंद यांच्या माध्यमातून विकासकामे झाली असल्याने आम्ही त्यांच्यासोबत”, शिवाजीनगरमधील नागरिकांचा निर्धार

Maval Assembly Election 2024 | सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट; बापू भेगडेंचे कडवं आव्हान,
मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ

Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!

Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची
भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ –
सुप्रिया सुळे (Video)

You may have missed