Lonikand Pune Crime News | कार अंगावर घालून चौघांना जीवे मारण्याचा प्रयत्न ! तिघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल, लोणीकंद-तुळापूर-आळंदी रोडवरील घटना

CRIME

पुणे : Lonikand Pune Crime News | तुमच्यामुळे रोडवर ट्राफिक जाम होत आहे, तुम्ही रोडचे बाजूला व्हा, असे म्हणाल्याच्या कारणावरुन कारमधील तिघांनी चौघांच्या अंगावर कार घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. (Attempt To Murder)

या घटनेत जगदीश सुरेश शिवेकर (वय ३०), सुहास हरिदास शिंदे, सोनम कविता अंधारे (वय २६), आश्विनी दत्तु पावसे (वय २०) हे गंभीर जखमी झाले आहेत. जगदीश याच्या डोक्याला, तोडाला, छातीला, पोटाला, जबर दुखापत झाली असून सोनम अंधारे आणि आश्विनी पावसे याही जखमी झाल्या आहेत.

याबाबत संकेत चिंधु पडवळ (वय २४, रा. कुरकुंडी, ता. राजगुरुनगर) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गौरव दिपक लगड Gaurav Deepak Lagad (वय २२, रा. भारत पेट्रोलपंपाशेजारी, तुळापूर), अविनाश बनकड शेळके Avinash Bankad Shelke (रा. आळंदी) आणि सुरेखा अनंत सवने Surekha Anant Savane (रा. तुळापूर) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना तुळापूर -आंळदी रोडवरील (Lonikand-Tulapur-Alandi Road) अर्मासेल कंपनी समोरील रोडवर मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोडवर ट्रॉफिक जाम झाले होते. तेव्हा जगदीश शिवेकर हा आरोपींना रोडवर ट्रॉफिक जाम होत आहे, तुम्ही रोडचे बाजूला व्हा, असे म्हणाला. त्यावरुन त्यांनी कारमधून उतरुन जगदीश, सोनम आणि आश्विनी यांना शिवीगाळ करुन मारहाण केली.
त्यानंतर गौरव याने त्यांची अल्ट्राज कार भरधाव त्यांच्या दिशेने चालवून तुमचा जीव घेतल्याशिवाय मी राहणार नाही,
असे म्हणून त्यांच्या अंगावर गाडी घातली. त्यात तिघे जण गंभीर जखमी झाले. सुरेखा हिने तू यांना सोडू नकोस,
असे म्हणून त्याला चिथावणी दिली. त्याने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या स्विफ्ट कार व मोटार सायकलला ठोस देऊन त्यांचे नुकसान केले.
सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे तपास करीत आहेत. (Lonikand Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar Z+ Security Cover | झेड प्लस सुरक्षेबाबत संशय, शरद पवार तातडीने दिल्लीला रवाना; घडामोडींना वेग

Pune Crime Branch News | खूनासह 4 गुन्हे असलेल्या गुंडाकडून पिस्टल व एक जिवंत राऊंड जप्त; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Ganesh Biradar | बारामती अपर पोलीस अधीक्षकपदी गणेश बिरादार

Sadashiv Peth Pune Fire News | आग लागलेल्या घरातून श्वानाची सुखरुप सुटका; सदाशिव पेठेतील रमेश डाईंगजवळील घटना

You may have missed