Love Jihad Law | उत्तर प्रदेशात ‘लव्ह जिहाद प्रतिबंध बिल’ विधानसभेत मंजूर, कोणीही करू शकणार तक्रार; जन्मठेप पर्यंतच्या शिक्षेची तरतुद
लखनऊ : Love Jihad Law | यूपी विधानसभेत लव्ह जिहाद प्रतिबंध कायदा संमत करण्यात आला आहे. आता संपूर्ण राज्यात फसवणुकीने अथवा बळजबरीने करण्यात आलेल्या धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये कायदा आणखी कठोर होईल. या कायद्यांतर्गत दोषींना कठोर शिक्षेची तरतुद आहे. (Love Jihad Bill Passed In UP Assembly)
उत्तर प्रदेशात राहणार्या कोणत्याही महिलेला आपल्या जाळ्यात अडकवून धर्मांतर करून छळ करणाची घटना म्हणजे लव्ह जिहादच्या दोषींना पहिल्यांदाच जन्मठेपेची शिक्षा होईल. अवैध धर्मांतराच्या गंभीर घटनांना प्रतिबंध करण्यासाठी सरकारने कायद्याची कक्षा आणि शिक्षेचा कालावधी वाढवला आहे.
उत्तर प्रदेशात पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उत्तर प्रदेश कायदा धर्मांतर प्रतिबंध (दुरूस्ती) विधेयक-2024 सादर करण्यात आले, जे मंजूर करण्यात आले आहे.
लव्ह जिहाद प्रतिबंध बिल काय आहे?
या विधेयकानुसार आता जर कोणी व्यक्ती धर्मपरिवर्तन करण्याच्या उद्देशाने एखाद्या व्यक्तीला तिचे जिवितासाठी अथवा संपत्तीसाठी धमकावत असेल, हल्ला करत असेल, विवाह अथवा विवाह करण्याचे वचन देत असेल, अथवा कट रचत असेल, अल्पवयीन, महिला अथवा एखाद्या व्यक्तीची तस्करी करत असेल तर त्याच्या गुन्ह्याला सर्वात गंभीर श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
ही आहे शिक्षेची तरतुद
अशा प्रकरणात आरोपीला किमान 20 वर्ष कारावास अथवा आजन्म कारावासाची शिक्षा आणि दंड ठोठावला जाईल.
न्यायालय पीडितेच्या उपचाराचा खर्च आणि पुनर्वसनासाठी रक्कम दंडाच्या रूपात ठरवू शकेल.
गंभीर गुन्ह्याप्रमाणे आता कोणीही व्यक्ती धर्मांतराच्या प्रकरणात एफआयआर नोंदवू शकतो.
यापूर्वी धर्मांतराने पीडित व्यक्ती, त्याचे नातेवाईक अथवा जवळचा नातेवाईकांनाच एफआयआर नोंदवण्याची व्यवस्था होती.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक
BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार
Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश