LPG Gas Cylinder | युद्धामुळे गॅस तुटवड्याचे संकट: आता 14 किलोऐवजी मिळणार कमी वजनाचा गॅस सिलिंडर

LPG Gas Cylinder | Gas shortage crisis due to war: Now you will get a lighter gas cylinder instead of 14 kg

नवी दिल्ली : LPG Gas Cylinder | इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला नैसर्गिक वायूचा तुटवडा लक्षात घेता, केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणात एक मोठा आणि महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सर्वसामान्य नागरिकांना मिळणारा १४.२ किलोचा घरगुती गॅस सिलिंडर पूर्ण भरलेला न मिळता, तो केवळ ८ ते १० किलोच्या प्रमाणात उपलब्ध करून दिला जाणार आहे.

पश्चिम आशियातील युद्ध दिवसेंदिवस चिघळत चालले असून, इस्रायलने इराणमधील गॅस फिल्ड्स आणि तेल साठ्यांवर हल्ले केले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतारमधील मोठ्या नैसर्गिक वायू साठ्यांना लक्ष्य केल्यामुळे जगभरात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. या सुविधा पूर्ववत होण्यासाठी मोठा काळ लागण्याची शक्यता असल्याने, आगामी काही महिने हा तुटवडा जाणवणार आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी भारताने आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली असून, गॅस कंपन्यांना सिलिंडरमध्ये कमी प्रमाणात गॅस भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे गॅस सिलिंडरचे वजन कमी होणार असले, तरी ग्राहकांना केवळ त्यातील गॅसच्या वजनानुसारच पैसे मोजावे लागणार आहेत. सध्या साठ्यात असलेले १४.२ किलोचे सिलिंडर संपल्यानंतर नवीन वितरणात हा बदल लागू होईल. मात्र, कमी गॅसमुळे सिलिंडर लवकर संपणार असल्याने गृहिणींचे आणि सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. या कमी वजनाच्या सिलिंडरची नेमकी किंमत काय असेल आणि सर्वसामान्य जनता यावर कशी प्रतिक्रिया देईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, सहायक पोलीस निरीक्षक गोडबोले, पोलीस उपनिरीक्षक सुनिल जावळे, पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोर्‍हाडे, सागर सूर्यवंशी, मनोज साबळे, सोनवाने, पोलीस अंमलदार गोनटे, स्वप्निल महाले, शशिकांत नांगरे, तुषार वराडे, समीर काळे, सुंदर थोरात, सुधीर दांगट, निखिल फापाळे, राजकुमार इघारे, भोर, सहायक पोलीस फौजदार माळी, हवालदार ननावरे, पोलीस अंमलदार कारके, हुलगे यांनी केली आहे.

You may have missed