Magarpatta Hadapsar Pune Crime News | तुमचा कुत्रा आमच्या श्वानाला चावला; पुण्यात भल्यापहाटे दोन मालक भिडले; वाद पोहोचला पोलीस ठाण्यात
पुणे : Magarpatta Hadapsar Pune Crime News | पुण्यात कुत्र्यामुळे तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. तुमचा कुत्रा आमच्या श्वानाला चावला, असे म्हणत दोन मालक भल्या पहाटे एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या या वादामुळे शेजारच्या नागरिकांना याचा नाहक त्रास झाला. त्यामुळे या नागरिकांनी संताप व्यक्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मगरपट्टा परिसरात ही घटना घडली आहे. अमेरिकन पिटबुल या श्वानाच्या जातीने दुसऱ्या श्वानावर हल्ला केला त्यामुळे या दोन्ही श्वानाच्या मालकांमध्ये तुफान राडा झाला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कुत्र्यावरून झालेला हा वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला. दोन्ही श्वान मालकामध्ये हल्ल्यावरून वाद झाला. घातक श्वानाच्या प्रजातीमुळे मगरपट्टा परिसरातील रहिवासी संतप्त झाले आहेत. पिटबुलला बंदी असतानाही अशा घातक श्वानांच्या जाती अनेक लोक पाळतात. पिटबुल हल्ला करू शकतात याची नागरिकांना भीती आहे. (Magarpatta Hadapsar Pune Crime News)
मगरपट्ट्यातील बाबुळ गार्डन येथील एका बंगल्यात असणाऱ्या श्वान मालकाबरोबर शेजारच्या वाद झाला. अमेरिकन पिटबुल नावाचा श्वान दुसऱ्या श्वानाला चावल्याने शेजारील नागरिकांनी श्वान मालकाच्या घरात जाऊन विचारपूस केली. यावेळी पिटबुल श्वानाच्या घरातील महिलांनी आरडाओरडा करत वाद घातला. श्वानामुळे झालेला हा संपूर्ण वाद सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्हीत पिटबुल दिसत आहे. या संदर्भात हडपसर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मगरपट्टा परिसरात आम्ही आमच्या घरात सुरक्षित नाही कारण असे पाळीव प्राणी आणि
त्याचे मालक यांचा त्रास आम्हाला सहन करावा लागतो, असे तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये म्हटले आहे.
श्वानांच्या घातक जातीमध्ये पिटबुल ही प्रजाती येते. सध्या भारतामध्ये श्वानांच्या काही घातक प्रजातींना बंदी आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान
Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी
Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून
Pune Crime Court News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्या प्रकरणी बॅंक कर्मचाऱ्याला जामीन मंजूर