Mahadev Jankar | पुढच्यावेळी बारामतीमधून लढणार, लोकसभा निवडणुकीबाबत महादेव जानकरांची घोषणा, ”5 वेळा पराभव झाला पण…”
मुंबई : Mahadev Jankar | पुढच्या निवडणुकीसाठी माझी आता बारामतीसाठी तयारी सुरू आहे. बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) निवडणूक मी लढणार आहे, अशी घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केली आहे. ते अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे बोलत होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जानकर यांचा परभणी लोकसभा मतदारसंघात पराभव झाला असतानाही आता त्यांनी पुढील लोकसभेचा मतदारसंघच जाहीर केला आहे. (Mahadev Jankar)
महादेव जानकर म्हणाले, महाराष्ट्रातील पाच लोकसभा मी लढल्या आहेत. याआधी नांदेड, सांगली, माढा, परभणी, बारामती लोकसभा लढलो. या पाचही ठिकाणी माझा पराभव झाला. पण मतदान वाढत चालले आहे, मतदान कमी झाले नाही.
महादेव जानकर पुढे म्हणाले की, आज आमच्या पक्षाचा विधानसभेत आमदार आहे, विधान परिषदेत आमदार आहे. पक्षाला मान्यता मिळत चालली आहे. विदर्भात आम्ही कमी आहे. गडचिरोलीला जिल्हा बँकेचा अध्यक्ष आमचा आहे. दरम्यान, पराभणी लोकसभा मतदारसंघातील पराभवाबाबत जानकर म्हणाले, मुस्लिम आणि दलित मतदार विरोधात गेल्याने येथे माझा पराभव झाला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Raigad ACB Trap | बांधकामाचे देयक मंजूर करण्यासाठी वित्त अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीकडून अटक
Ajit Pawar Vs Sharad Pawar | पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला लवकरच धक्का,
माजी महापौरांसह 15 ते 20 नगरसेवक ‘या’ मुहूर्तावर वाजवणार तुतारी!
Pimpri Chinchwad Cyber Cell | पिंपरी : कर्ज फेडण्यासाठी दिघीतील व्यक्तीला अडीच कोटींचा गंडा,
सायबर पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या (Video)