Mahakumbh | कुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ बनवून विकले, लातूर- सांगलीतून दोघे अटकेत

Arrest

सांगली : Mahakumbh | कुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ बनवून ते टेलिग्राम आणि युट्युबवर विकल्याप्रकरणी लातूरमधून प्रज्वल अशोक तेली आणि सांगलीमधून प्रज राजेंद्र पाटील यांना अटक करण्यात आली आहे. १९ फेब्रुवारीला राजकोटच्या पायल हॉस्पिटलमध्ये महिलांच्या चेकअपचे व्हिडिओ युट्युबवर अपलोड केल्याचे प्रकरण समोर आले होते.

गुजरात पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करताना महाराष्ट्रातून दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांच्या चौकशीनंतर पोलिसांनी प्रयागराजमधून युट्युबर चंद्रप्रकाश फुलचंदला अटक केली आहे. तपासादरम्यान आरोपींकडे महिलांचे आक्षेपार्ह फुटेजही सापडले आहे. हे रॅकेट मागच्या वर्षभरापासून सुरू आहे, आता आरोपींना रिमांडमध्ये घेण्यात आले आहे. याप्रकरणी प्रज्वल तेली मुख्य आरोपी आहे. या तीनही आरोपींनी ८ महिन्यात लाखो रुपये जमा केले.आरोपींनी व्हिडिओ ८०० ते २००० रुपयांना विकले. हॉस्पिटलचे आयपी ऍड्रेस रोमानिया आणि अटलांटा मधून हॅक केले होते. प्रज्वलने रोमानिया आणि अटलांटाच्या हॅकर्सना संपर्क केला होता.

अहमदाबादच्या सायबर क्राईमचे डीसीपी लवीना सिन्हा म्हणाले, ” तपासात तिघांनी महाकुंभमध्ये स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ दुसऱ्या चॅनलना विकले. चंद्रप्रकाश फुलचंद स्वत: व्हिडिओ बनवायचा. हे व्हिडिओ तो स्वत:च्या चॅनलवर अपलोड करायचा आणि ऑनलाईन विकायचा. आरोपीच्या टेलिग्राम चॅनलवर १०० पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. हे आरोपी महागड्या रेटने व्हिडिओ विकायचे. तसेच या आरोपींनी देशातल्या ६०- ७० हॉस्पिटलचे सीसीटीव्ही हॅक केल्याचा संशयही पोलिसांना आहे.”

उत्तर प्रदेशचे डीजीपी प्रशांत कुमार म्हणाले, ” महाकुंभमध्ये महिलांचे स्नान करतानाचे व्हिडिओ अपलोड केल्याप्रकरणी आतापर्यंत ३ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय महाकुंभबाबत अफवा पसरवल्याप्रकरणी ५५ ते ६० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.” (Mahakumbh)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

You may have missed