Maharashtra ACB News | भ्रष्टाचाराचे लोकांनाच काही पडले नाही ! लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारीचे प्रमाण 15 टक्क्यांनी घटले, अपसंपदा बाळगल्यांची 3168 कोटींची मालमत्ता जप्त

ACB

पुणे : Maharashtra ACB News | विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशांचा सत्ताधारी पक्षांकडून वापर झाल्याची टिका विरोधी पक्षातील वरिष्ठ नेते करत होते. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर झाला असला तरी लोकांना आता त्याचे काहीच पडले नसल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे येणार्‍या तक्रारीवरुन दिसून येते. गेल्या ११महिन्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे येणार्‍या आणि सापळा कारवाईमध्ये तब्बल १५ टक्के घट झाली आहे. (Bribe Cases)

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी ते ३० नोव्हेबर २०२४ अखेर ६२१ सापळा कारवाया करुन त्यात ९०६ आरोपींना पकडले. याच दरम्यान २०२३ मध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ७३३ सापळा कारवाया करुन १ हजार २९ लाचखोरांना पकडले होते. गेल्या ११ महिन्यात ११२ ने कारवाई कमी झाली असून हे प्रमाणे तब्बल १५ टक्के कमी आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई कमी होण्यामागे लोकांच्या तक्रारी येण्याचे प्रमाण कमी झाले हे मुख्य कारण आहे.

नाशिक विभाग आघाडीवर

लाचखोरांवर कारवाई करण्यात नाशिक विभाग आघाडीवर आहे. त्यांनी या वर्षी १३५ सापळा कारवाया करुन त्यात १९१ लाचखोरांना पकडले आहे. त्याखालोखाल पुणे विभागाने ११९ सापळा कारवाया करुन १६७ लाचखोरांना पकडले आहे.

बेकायदा मालमत्ता बाळगणार्‍यांवर मोठी कारवाई

लाचखोरांवरील सापळा कारवाया कमी झाल्या असल्या तरी उत्पन्नाच्या तुलनेत बेकायदा मालमत्ता बाळगणार्‍या शासकीय अधिकार्‍यांवरील कारवाईत गेल्या ८ वर्षातील सर्वाधिक कारवाई यावर्षी झाली आहे. अपसंपदा बाळगल्याप्रकरणी या ११ महिन्यात तब्बल ३० गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात ५८ आरोपी आहेत. मुख्य म्हणजे या सर्व ३० गुन्ह्यांमध्ये तब्बल ३१६८ कोटी ६५ लाख १० हजार ४०१ रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

लाचखोरीबाबत जनजागृती

शासकीय कामासाठी पैसे द्यावे लागतात, असे जवळपास लोकांनी मान्य केले असल्याचे दिसून येत आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे लोकांच्या तक्रारी येण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
लोकांनी लाचेबाबत तक्रारी कराव्यात, यासाठी त्यांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तालुक्या तालुक्यात जाऊन, आठवडे बाजारात जाऊन जनजागृती करण्याची मोहिम हाती घेतली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी

You may have missed