Maharashtra Assembly Election 2024 | शरद पवारांना धक्का? राष्ट्रवादी शरद पवार गटाचा बडा नेता भाजप प्रवेशाच्या तयारीत, विनोद तावडेंशी बंद दाराआड चर्चा

Vinod Tawade-Sharad Pawar

सांगली : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय हालचालींना वेग आला आहे. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेलाही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) अशी लढाई होणार आहे. दरम्यान राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून भाजपा नेते (BJP Leader) विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) नेते माजी आमदार शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

आज सांगलीत भाजपा (Sangli BJP Workers Melava) कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला भाजपा नेते विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी मेळावा संपल्यानंतर शरद पवार गटाचे नेते माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड राजकीय चर्चा चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

माजी आमदार नाईक भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा काही दिवसापासून सुरू आहेत. याआधीही नाईक भाजपामध्येच होते, पण महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Govt) काळात त्यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तावडेंच्या भेटीनंतर नाईक आता पुन्हा एकदा भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसापूर्वी कोल्हापूरातील भाजपा नेते समरजीतसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) यांनी भाजपामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे शरद पवार भाजपाला आणखी एक धक्का बसणार देणार असल्याचे बोलले जात आहे.

इंदापुरचे (Indapur Assembly Constituency) भाजपा नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil), अहमदनगरचे भाजपा नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) हेही शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता शरद पवार गटातील नेताही भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

शिराळा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक (Mansing Naik) आहेत.
याआधी शिवाजीराव नाईक यांचा या मतदारसंघातून विजय झाला होता.
पण, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नाईक यांचा पराभव झाला. (Maharashtra Assembly Election 2024)

दरम्यान, आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून सम्राट महाडिक (Samrat Mahadik) यांचे नाव चर्चेत आहे.
महाडिक यांनी यावेळी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षापासून आमदारकीसाठी तयारी केली आहे.
तर, दुसरीकडे भाजपा नेते सत्यजित देशमुख (Satyajit Deshmukh) यांचीही ताकद या मतदारसंघात मोठी आहे,
यामुळे भाजपा यावेळी नेत्यांची मोट बांधून पुन्हा एकदा शिराळा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”

Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून

Malabar Gold & Diamonds | मलाबार गोल्ड अँड डायमंड्सला 2023-24 साठी प्रतिष्ठित ‘इंडिया गोल्ड कॉन्फरन्स’ पुरस्काराने केले सन्मानित

Chief Engineer Rajendra Pawar | मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार प्रदान