Maharashtra Assembly Election 2024 | भाजपला हरवणे हेच आप चे सध्याचे लक्ष ! आम आदमी पार्टी विधानसभा निवडणूक लढवणार नाही

AAP

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यावर आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती आप प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी आज प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.

आम आदमी पार्टी ही राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडी चा भाग असून भाजप ला हरवण्यासाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांना मदत करेल. त्यामुळे महाराष्ट्रात आम आदमी पार्टी २०२४ च्या विधानसभा निवडणूक लढवणार नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आम्हाला महाराष्ट्रात निवडणूक लढवण्यासाठी जागा देऊ केल्या पण हा जागा लढवण्याचा विषय नसून दमनकारी, हुकुमशहा भाजपला पराभूत करण्याची बाब अधिक महत्वाची आहे. अन्यथा हरियाणासारखे विरोधी पक्षांच्या मतांच्या विभाजनामुळे भाजप युतीसरकार पुन्हा सत्तेत येईल असे मुकुंद किर्दत यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.

या निवडणूक लढवावी असा आग्रह राज्यातील कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी धरला होता . अनेक जागांवर इच्छुकानी तशी तयारी सुरू केली होती . मुंबई , पुणे , नागपुर सारख्या शहरात आम आदमी पार्टी चांगले मतदान घेवू शकते ही भीती सर्वच राजकीय पक्षांना होती. मागील निवडणुकीत कमी मत फरकाने निवडून आलेल्या जागावर याचा फटका मुख्यत्वे महाविकास आघाडीला बसू शकतो अशी शक्यता राजकीय विश्लेषक मांडत होते. पुण्यात सर्वच विधानसभा क्षेत्रात आप ने संघटन बांधणी केली आहे. ग्रामीण क्षेत्रातही आप ला चांगला प्रतिसाद आहे. मध्यंतरी लोकसभा निवडणुकीत आप कार्यकर्त्यांनी चांगले काम केल्याची प्रतिक्रिया शरद पवार, सुप्रिया सुळे आदींनी दिली होती.

‘आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही महाराष्ट्रात इंडिया आघाडीला विजय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असे म्हंटले आहे.
आप महाराष्ट्रात शिक्षण आरोग्य तसेच अनेक नागरी समस्यांवर आवाज उठवत असून हा केडर बेस असलेला पक्ष असून
येणार्‍या काळात प्रभाग पातळीपर्यंत संघटन बांधणी केली जाईल’ असे मुकुंद किर्दत यांनी संगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त

Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्‍या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)

Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर

Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

You may have missed