Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध

Parking-Updates

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation – PMC) क्षेत्रातील दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी (२० नोव्हेंबर) तात्पुरत्या स्वरूपात वाहनतळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध करण्यात आले आहे, मतदारांनी या वाहनतळाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे (Suhas Diwase) यांनी केले आहे.

दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारती ६८ आहेत. यामध्ये शिरुर विधानसभा मतदासंघात १, पुरंदर ४, वडगावशेरी १६, शिवाजीनगर ५, कोथरुड ९, खडकवासला ९, पर्वती ४, हडपसर १७ , पुणे कॅन्टोन्मेंट २ आणि कसबापेठ १ इमारतीचा समावेश असून या ठिकाणी वाहनतळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध् करुन देण्यात आले आहेत.

या मतदान केंद्राशिवाय शहरातील इतर मतदान केंद्रासाठीही मतदानाच्या दिवशी तात्पुरत्या स्वरूपात वाहनतळाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यामध्ये शिरुर विधानसभा मतदासंघात ३ , पुरंदर ५ , वडगावशेरी ४१ , शिवाजीनगर २१, कोथरुड ११, खडकवासला १७, पर्वती २७, हडपसर ४१ , पुणे कॅन्टोन्मेंट ३४ आणि कसबापेठ २० याप्रमाणे २२० मतदान केंद्र आहेत, अशी माहिती डॉ. दिवसे यांनी दिली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल

Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ : बापुसाहेब हे सामान्यांचे आधार – खासदार नीलेश लंके

You may have missed