Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने भाजपा-राष्ट्रवादीत जुंपली; राजकीय वातावरण तापलं

लातूर: Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेस आमदार अमित देशमुख (Congress MLA Amit Deshmukh) यांच्या जाहीर वक्तव्यानंतर लातूरमधील राजकीय (Latur Political News) वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. देशमुख यांच्या वक्तव्याने अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) आमदार अडचणीत आले आहेत.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (LDCC Bank GB) सर्वसाधारण सभेत बोलताना अमित देशमुख यांनी लोकसभा निवडणुकीत अहमदपूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी काँग्रेसला मदत करण्याचे धोरण स्वीकारले होते. त्याबद्दल आपले आभार असे वक्तव्य केल्याने भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट यांच्यातला संघर्ष समोर आला आहे.
लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे बाबासाहेब पाटील यांनी भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार केला त्याच प्रकारे आम्हीही प्रचार करणार. आम्ही त्यांच्याबरोबर असू मात्र भाजपाचा एकही व्यक्ती त्यांच्याबरोबर नसणार आहे, असं वक्तव्य भाजपचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख (Dilip Deshmukh) यांनी केले आहे.
अमित देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सर्व बाबी स्पष्ट झाल्या आहेत. पक्षश्रेष्ठींनी सांगितलेला आदेश पाळू मात्र, मतदार काय करतील ते सांगता येणार नाही, असा सूचक इशारा दिलीप देशमुख यांनी दिला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maj Gen Anurag Vij At Bhau Rangari Ganpati | मेजर जनरल अनुराग वीज यांनी घेतलं
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)