Maharashtra Assembly Election 2024 | मतदानानंतर क्यूआर कोड स्कॅन केल्यास मिळणार प्रमाणपत्र – जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Suhas Diwase

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पुणे जिल्ह्यात अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत; त्याअंतर्गत दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान केल्यानंतर मतदान केंद्रावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यास मतदाराला प्रमाणपत्र मिळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Suhas Diwase) यांनी दिली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणूक सहभाग (स्वीप) अंतर्गत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मिळणारे प्रमाणपत्र ही मतदारासाठी गौरवाची बाब असणार असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी त्याचा लाभ होणार आहे. मतदारांना मतदानाचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी एक क्यूआर कोड तयार करण्यात आला असून त्याचे स्टीकर्स सर्व विधानसभा मतदार संघांना वितरीत करण्यात आले आहेत.

मतदान केल्यानंतर मतदान केल्याचे प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून त्यासाठी मतदान केंद्राबाहेरील स्टीकरवरचा क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर उघडणाऱ्या फॉर्ममधील माहिती अचूक भरावी तसेच मतदानाची शाई असलेल्या बोटासोबतचा सेल्फी अपलोड करावा. त्यानंतर आपण फॉर्ममध्ये भरलेल्या ई-मेल वर आपले मतदान केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी दि. २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात
सहभागी व्हावे, असे आवाहनही डॉ.‍ दिवसे यांनी केले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”

You may have missed