Maharashtra Assembly Election 2024 | बाप-लेकामध्ये लढत होणार? विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या मुलाला नरहरी झिरवळांचा सल्ला; म्हणाले – ‘मी दिलेल्या भांडवलावर लढण्यापेक्षा…’

Gokul Narhari Zirwal

दिंडोरी : Maharashtra Assembly Election 2024 | अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) आमदार नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) काल पक्षाच्या बैठकीला गैहजर असल्याने चर्चांना उधाण आले. विधानसभा जागांचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला अजित पवार गटाचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र नरहरी झिरवळ अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात कुजबुज सुरु झाली.

मागेच नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ (Gokul Narhari Zirwal) हे मागे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आयोजित केलेल्या निष्ठावान संवाद मेळाव्यास उपस्थित राहिले होते. तसेच माझी निष्ठा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर असल्याचंही गोकुळ झिरवळ यांनी स्पष्ट केले होते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिंडोरीमधील (Dindori Assembly Constituency) जनसन्मान यात्रेदरम्यान नरहरी झिरवळ यांची दिंडोरीचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली.

त्याआधी गोकुळ झिरवळ यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी हवी असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघात वडील विरुद्ध मुलगा अशी लढत होण्याची चिन्ह आहेत. याविषयी बोलताना नरहरी झिरवळ यांनी मुलाला खोचक शब्दात टोला लगावला आहे.

शरद पवार गटाच्या कार्यक्रमात मुलाच्या उपस्थितीवरून ते म्हणाले, “त्याने सत्कार करू का असे विचारले होते. मी म्हटलो सत्कार कर आणि निघून ये. हा गेला तर गेला याची आमदार होण्यापर्यंत मजल गेली तर कसं व्हायचं?,” असं नरहरी झिरवळ म्हणाले.

“राजकारणात प्रत्येकाला वाटतं मी काहीतरी केलं पाहिजे. त्याचे वय पाहता त्याने अजून खूप काही करणं गरजेचं आहे.
मी दिलेल्या भांडवलावर लढण्यापेक्षा त्याने स्वतःच काहीतरी करावं. सगळंच बापाचं वापरून कसं चालणार?,
असेही नरहरी झिरवळ म्हणाले.

तसेच त्याचा बाप ग्रामपंचायत सदस्यापासून वर जात गेला तेव्हा आमदारपर्यंत पोहोचला.
बापापेक्षा मोठं व्हायचं असेल तर तिथून सुरुवात करायला हवी. समजून घेण्यात पाच नाही तर दहा वर्षे जातात.
त्याने ते उद्योग करू नये, असा सल्लाही नरहरी झिरवळ यांनी दिला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Water Storage In Pune Dam | पुणेकरांसाठी गुड न्यूज ! पाण्याचं टेन्शन मिटलं; कोणत्या धरणात किती पाणीसाठा? जाणून घ्या

Pune Crime News | नवीन मोटारसायकलची राईड बेतली जीवावर ! पाण्याच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यु

Sharad Pawar | शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण झाली असती पण…’

You may have missed