Maharashtra Assembly Election 2024 | निवडणुकीच्या तोंडावर निलेश लंकेंकडून अजित पवारांना धक्का; उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवकांनी घड्याळ सोडत हाती घेतली तुतारी

Ajit Pawar - Nilesh Lanke

सोलापूर: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. दरम्यान राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोलापूरमधील (Solapur Politics News) जवळपास सर्वच मतदारसंघात बंडखोरी झालेली आहे. पुढील दोन-चार दिवसात बंडखोरी रोखता आली तर ठीक अथवा येथील निवडणूक मोठ्या चुरशीची होणार आहे.

शांतच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (Ajit Pawar NCP) मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटातील निरंजन भूमकर (Niranjan Bhumkar) यांच्यासह १५ नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात (Sharad Pawar NCP) प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अजित पवार गटाचे बार्शी तालुक्यातील नेते निरंजन भूमकर यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश झाला आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत गोविंद बाग येथे भूमकरांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह १५ नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. भूमकर हे वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. तसेच या नगरपंचायतीवर भूमकर यांची एकहाती सत्ता आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Raj Thackeray On Eknath Shinde-Ajit Pawar | ‘पक्षाचे नाव व चिन्ह घेणं योग्य नाही’, सत्तासंघर्षांवरून राज ठाकरेंचा शिंदेंसह अजित पवारांना टोला; म्हणाले…

Chinchwad Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल; वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

Katraj Pune Crime News | कात्रजमध्ये गुंडांचा हैदोस ! तरुणांना मारहाण करुन रिक्षा, कारच्या काचा फोडून माजवली दहशत

Maharashtra Assembly Election 2024 | केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने कमविले किमान 43 लाख 62 हजार रुपये जादा