Maharashtra Assembly Election 2024 | २८८ मतदार संघात ७ हजार ९९५ उमेदवारांचे जवळपास १० हजार ९०५ उमेदवारी अर्ज दाखल; सर्वाधिक उमेदवारी अर्ज कोणत्या मतदारसंघात? ‘या’ मतदारसंघात अवघे ९ उमेदवारी अर्ज

Vidhansabha

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची काल (दि.२९) शेवटची मुदत होती. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांसह अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहेत. राज्यातल्या २८८ मतदार संघात ७ हजार ९९५ उमेदवारांचे जवळपास १० हजार ९०५उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.

यामध्ये सर्वाधिक उमेदवारी अर्ज हे नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदार संघात दाखल झाले आहेत. तर सर्वात कमी उमेदवारी अर्ज हे कणकवली विधानसभा मतदार संघात दाखल झाले आहे.

दाखल केलेले उमेदवारी अर्ज हे ४ नोव्हेंबरपर्यंत मागे घेता येणार आहेत. या निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्षांना मोठ्या प्रमाणात बंडखोरीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे कोणता पक्ष बंडखोरी रोखण्यास यशस्वी होतो हे ४ नोव्हेंबरला चित्र स्पष्ट होईल.

नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदार संघात सर्वात जास्त उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. या मतदार संघात तब्बल १६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या मतदार संघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया अशोक चव्हाण उमेदवार आहे. त्या भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

तर कोकणातील कणकवली विधानसभा मतदार संघात सर्वात कमी अर्ज आले आहेत. या मतदार संघात केवळ ९उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या मतदार संघातून भाजपचे नितेश राणे हे मैदानात आहेत. त्यांना शिवसेना ठाकरे गटाच्या संदेश पारकर यांचे आव्हान असणार आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chinchwad Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल; वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

Katraj Pune Crime News | कात्रजमध्ये गुंडांचा हैदोस ! तरुणांना मारहाण करुन रिक्षा, कारच्या काचा फोडून माजवली दहशत

Maharashtra Assembly Election 2024 | केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने कमविले किमान 43 लाख 62 हजार रुपये जादा

You may have missed