Maharashtra Assembly Election 2024 | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले – ‘पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’

Kolhe-Amol-Pawar-Ajit

सोलापूर: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’, असा टोला अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना लगावला आहे. (Amol Kolhe On Ajit Pawar)

अमोल कोल्हे म्हणाले, ‘ चुकीला क्षमा होऊ शकते मात्र गद्दारीला माफी नाही. अजितदादा इतके दिग्गज नेते असूनही त्यांना गावोगावी भावनिक आवाहन करत फिरावे लागत आहे. त्यांना जनतेचा मूड नक्की कळलेला आहे. यंदा पक्ष फोडणारे आणि चिन्हे पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल”, असे अमोल कोल्हे यांनी म्हंटले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

ते पुढे म्हणाले,” सर्व्हे करणारी कंपनी ही अदानी यांची असून ते सध्या भाजपाला खुश करायचं काम करत आहेत. मात्र, इतकी करुनही त्यांना १४५ ते १६५ एवढ्या जागा दाखवाव्या लागत आहेत. भाजपाला खुश करण्यासाठी कितीही रेटलं तरी त्यांना काठावरच्या बहुमताच्या पुढे जाता येत नसल्याचे सर्व्हे दाखवत आहेत. यामुळं केवळ काठावरचे मतदार जे आहेत त्यांना भ्रमित करण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी असे सर्व दिले जात आहेत.

ही कंपनी पूर्वी अनिल अंबानी यांची होती नंतर ती अदानी यांनी विकत घेतली.
हजारो कोटींची गुंतवणूक असणाऱ्या उद्योगपतींना आपला इंटरेस्ट साध्य करण्यासाठी असे करावे लागते.
मात्र महाराष्ट्राने आपलं मत पक्कं केले असून आता कोणत्याही परिस्थितीत महायुती सत्तेत येणार नाही”, असेही कोल्हे यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Supriya Sule On Devendra Fadnavis | “दोन पक्ष फोडल्याचा कसला अभिमान बाळगता”, सुप्रिया सुळेंचा सवाल; म्हणाल्या – ” धमक्यांचा काळ गेला, महिला लाटणे घेऊन मागे लागतील”

Jayant Patil On Vasant More | पुन्हा एकदा वसंत मोरे पक्ष बदलणार? जयंत पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा; म्हणाले – “वसंत मोरे यांच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ”

Shivaji Nagar Assembly Election 2024 | “मनीष आनंद यांच्या माध्यमातून विकासकामे झाली असल्याने आम्ही त्यांच्यासोबत”, शिवाजीनगरमधील नागरिकांचा निर्धार

Maval Assembly Election 2024 | सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट; बापू भेगडेंचे कडवं आव्हान,
मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ

You may have missed