Maharashtra Assembly Election 2024 | ‘वंचितचा फटका कोणालाही बसू शकतो’, राजकीय विश्लेषक सुहास पळशीकरांचे भाष्य; म्हणाले – ‘मनसेचा फटका शिंदेंच्या शिवसेनेला बसणार’
मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीचे चित्र काय असेल? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राज्यात महायुती (Mahayuti Govt) की महाविकास आघाडीचे सरकार (MVA Govt) असणार हे येणाऱ्या २३ तारखेला चित्र स्पष्ट होईल. मात्र यंदा अनेक पक्ष निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षाचा कोणाला फटका बसेल? या अनुषंगाने राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर (Suhas Palshikar) यांनी विश्लेषण केले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
माध्यमांशी बोलताना सुहास पळशीकर म्हणाले, ” महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेला (MNS) कधी काही जमलेलं नाही. क्वचित प्रसंगी त्यांचे आमदार निवडून आलेले आहेत. शिवसेनेत फुट झाल्यामुळे मुंबईत मराठी मतांचं काय होणार? हा मोठा प्रश्न आहे. त्याचा फायदा मनसे मिळवू शकते. लोकसभेचा निकाल पाहिला तर मनसेचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला (Shivsena Shinde Group) फटका बसू शकतो.
कारण मुंबईतील मराठी भाषिक भागांमध्ये त्यांना पाठिंबा मिळाला होता. मनसेचा मतदार जास्त करुन मराठी आणि मध्यमवर्गीय आहे. जो भाजप आणि शिवसेनचा पूर्वापारचा मतदार आहे, तोच आहे. त्यामुळे त्याठिकाणी मनसेचा शिंदेंना फटका बसू शकतो. मात्र, नाशिक, पुण्यात मनसेचं स्थानिक राजकारण आहे. त्या स्थानिक राजकारणात कोणालाही फटका बसू शकतो.
एमआयएमचा (MIM) फटका काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) बसू शकतो. एमआयएम हा पक्ष निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर उतरला आणि काही ठिकाणी त्यांनी मतं घेतली तर ती निश्चितपणे महाविकास आघाडीची मतं असणार आहेत.
ते पुढे म्हणाले,” गेल्या अनेक निवडणुकांमध्ये यश आला नसलेला पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे. समाजातील वंचित घटकाला विचारधारेने एकत्रित आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. व्यवहारात मात्र, त्यांचा पक्ष द्विधुरीय पद्धतीत कुठंही बसणारा नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावर वेगवेगळे आक्षेप घेतले जातात. आरोपही केले जातात.
वंचितमुळे (Vanchit Bahujan Aghadi-VBA) कोणी एकच पडतं असं नाही.
त्यांचा फटका कोणालाही बसू शकतो. जिथे भाजप आणि शिवसेनेला ओबीसींची मतं मिळत असतील,
तिथं वंचितचा तगडा उमेदवार असेल तर त्यांनाही फटका बसू शकतो.
तेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत पूर्वापार झालेलं आहे.
त्यामुळे निवडून येण्यापेक्षा किती जणांना फटका बसेल हे पाहावे लागेल”,
असे सुहास पळशीकर यांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्रात कोणाला बहुमत मिळेल ? हे विचारण्यापेक्षा कोणाला तरी बहुमत मिळेल का?
असा प्रश्न विचारायला पाहिजे. महाविकास आघाडी आणि महायुती बहुमताच्या बाजूला राहतील,
ही शक्यता मला जास्त वाटते. हे उमेदवार ठरण्याच्या आधी आणि प्रचार सुरु होण्याच्या आधी मी सांगत आहे.
हे लक्षात ठेवलं पाहिजे. सध्या पक्षांची विश्वासार्हता कमी होत असल्याचंही पळशीकर यांनी सांगितलं.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा