Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत वादंग! ‘काँग्रेसमधून उमेदवार आयात करू नका’, भाजपचा शिवसेना शिंदे गटाला इशारा

Devendra fadnavis-Eknath shinde

अहिल्यानगर: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीचे जागावाटप (Mahayuti Seat Sharing Formula) अंतिम टप्प्यात आलेले असतानाच श्रीरामपूरातील उमेदवारीवरून (Shrirampur Assembly Constituency) महायुतीत फूट पडण्याचे संकेत आहेत. (Mahayuti News)

काँग्रेसमधून उमेदवार आयात करू नका, अशी मागणी श्रीरामपूरमधील भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे. या मतदारसंघात हिंदुत्वासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय. ऐन वेळेला काँग्रेसी विचारधारेचा उमेदवार दिल्यास महायुतीचे नुकसान होणार, अशी भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

शिवसेना शिंदे गटाने (Shivsena Shinde Group) काँग्रेसी विचारधारेचा उमेदवार दिल्यास आम्ही वेगळी भूमिका घेऊ, असा इशारा भाजप ओबीसी मोर्चाचे सेलचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला आहे. श्रीरामपूर मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.

माजी खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांचे पुत्र प्रशांत लोखंडे (Prashant Lokhande) हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र ऐनवेळी दुसऱ्या पक्षातील उमेदवार आयात न करण्याचा इशारा भाजपने दिल्याने महायुतीत फूट पडणार असल्याचे दिसून येत आहे.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंकडून पुण्यातील इच्छुक उमेदवारांना समज;
म्हणाले – ‘पक्ष ज्याला उमेदवारी देईल…’

Maharashtra Assembly Election 2024 | राष्ट्रवादी-भाजपचे दोन बडे नेते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार; फडणवीसांसह अजित पवारांना आणखी एक धक्का

Congress Leader Mohan Joshi | रेल्वे बुकिंग कालावधी कमी करण्याचा मोदी सरकारचा निर्णय एजंटसाठी की जनतेसाठी? – माजी आमदार मोहन जोशी

You may have missed