Maharashtra Assembly Election 2024 | ‘या’ ठिकाणाहून होणार विधानसभा निवडणुकीचे कामकाज; ‘येथे’ भरावा लागेल उमेदवारी अर्ज

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून येत्या २२ तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार. प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी झाली असून शहरातील ८ विधानसभा मतदारसंघाचे कार्यालय सज्ज झाले आहेत. या कार्यालयातून निवडणुक प्रक्रियेचे कामकाज चालणार असून येथेच उमेदवारी अर्ज दाखल करणे, अर्जाची छाननी, व उमेदवारी अर्ज मागे घेणे ही कामे होणार आहेत. (Pune News)
२०८ वडगाव शेरी : सहायक आयुक्त, येरवडा – कळस – धानोरी विभागीय कार्यालय पुणे महानगर पालिका, पुणे १६
२०९ शिवाजीनगर : साने गुरुजी ग्रंथालय, दुसरा मजला, पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन, घोले रोड, पुणे ६
२१० कोथरुड : कै. अनुसयाबाई खिलारे शाळा, एरंडवणा, पुणे
२११ खडकवासला : पहिला मजला, एस के एन एस एस बी एम इमारत, सिंहगड कॉलेज कॅम्पस, सेंट्रल लायब्ररीजवळ, आंबेगाव बुद्रुक, ता़ हवेली
२१२ पर्वती : दुसरा मजला कै. भाऊराव सणस क्रीडांगण, सारसबागजवळ, पुणे
२१३ हडपसर : पुणे महापालिका विठ्ठल तुपे पाटील आॅडिटोरियम, माळवाडी, हडपसर, पुणे २८
२१४ पुणे कॅन्टोंमेंट : भारतरत्न श्री विश्वसराय्या हॉल, पी डब्ल्यु डी सबडिव्हिजन नं. ५ तिसरा मजला अर्सनल प्लॉट, सागर प्लाझाचे समोर, पुणे कॅम्प, पुणे
२१५ कसबा पेठ : गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेटजवळ, पुणे
या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे कामकाज चालणार आहे. हे कामकाज सुरळीतपणे व शांततेत पार पाडण्यासाठी कार्यालयाचे २०० मीटर परिसरात निर्बंध घालण्यात येत असल्याचा आदेश सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी काढला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना या ठिकाणी उमेदवारासोबत ४ पदाधिकारी किंवा सूचक/ कार्यकर्ते यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस आत जाण्यास मनाई करण्यात येत आहे.
या ठिकाणी कोणताही प्रचार करण्यास, सभा घेण्यास व कोणतीही घोषणाबाजी करण्यास मनाई करण्यात येत आहे.
या ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात येत आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना निवडणुक निर्णय अधिकारी व सहायक निवडणुक निर्णय अधिकारी
यांचे कार्यालयापासून १०० मीटरचे आत ३ वाहने घेऊन जाण्यास परवानगी आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणार्यास भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये शिक्षेस पात्र राहील असे या आदेशात म्हटले आहे.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?