Maharashtra Assembly Election 2024 | वयाच्या 104 व्या वर्षी गृहमतदान करून ‘त्यांनी’ लोकशाहीच्या उत्सवात नोंदवला सहभाग

Old Voter

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | पर्वती मतदारसंघातील (Parvati Assembly) ज्येष्ठ नागरिक आणि उद्योगपती चंद्रभान पुनमचंद भन्साळी यांनी वयाच्या १०४ व्या वर्षी गृहमतदानाद्वारे हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवला. श्री. भन्साळी यांच्यामध्ये असलेला उत्साह आणि लोकशाहीबद्दलची दृढ निष्ठा यावेळी पहावयास मिळाली. प्रत्येकाने मतदान करून आपली लोकशाही बळकट करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

निवडणूक निर्णय अधिकारी श्री मनोजकुमार खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पर्वती मतदारसंघात गृह मतदान प्रक्रिया सूरू करण्यात आली आहे. फॉर्म १२ डी भरून गृह मतदानासाठी नोंदणी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन ही प्रक्रिया पार पाडली जात आहे.

यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. भन्साळी यांचे गृह मतदान करून घेण्यासाठी हे पथक त्यांच्या घरी पोहोचले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व्यंकटेश दुर्वास, नायब तहसीलदार सरिता पाटील पथकासोबत भन्साळी यांच्या उपस्थितीत गृहमतदानाची प्रक्रिया पार पडली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”

You may have missed