Maharashtra Assembly Election 2024 | अपक्ष उमेदवारांना गळाला लावण्याचे प्रयत्न, विधानसभा निकालाआधीच मविआ, महायुतीच्या नेत्यांकडून संपर्क

Maharashtra Assembly Election

सोलापूर : Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (दि.२३) जाहीर होणार आहे. मात्र आता त्यापूर्वीच महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांकडून हालचाली वाढल्या आहेत. या नेत्यांनी अपक्ष उमेदवारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु केले आहे.

ज्या मतदारसंघात अपक्ष उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे, त्याठिकाणच्या उमेदवारांना महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी संपर्क केल्याची माहिती आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा आणि सांगोला मतदारसंघातील अपक्ष उमेदवारांना दोन्ही बाजूकडून निरोप यायला सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे.

माढ्याचे सलग सहा वेळा आमदार राहिलेले आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. रणजित शिंदे यांच्याकडे संभाव्य विजयी उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.

याच पद्धतीने रणजित शिंदे यांचे चुलते आणि करमाळा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आमदार संजय मामा शिंदे यांच्यावर देखील दोन्ही बाजूचे लक्ष आहे. ते देखील विजयी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्याचबरोबर सांगोल्यातून शेकापकडून निवडणूक लढवीत असलेले डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडे देखील संभाव्य विजयी उमेदवार म्हणून बघितले जात आहे. सध्या या सर्वच अपक्ष उमेदवारांना पक्षांचे निरोप यायला सुरुवात झाल्याची माहिती मिळाली आहे.

सांगोला शेकापचे अपक्ष उमेदवार बाबासाहेब देशमुख म्हणाले,
“मला महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांचे फोन आले आहेत.
मात्र, २३ तारखेनंतर आमचा पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल.” (Maharashtra Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pashan Pune Crime News | मनी लॉड्रिंगच्या नावाने आय टी इंजिनिअरची 6 कोटी 29 लाख रुपयांची
फसवणूक; डिजिटल अरेस्ट करुन सीबीआयच्या नावाने घातला गंडा

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित
राज्यस्तरीय किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Pune Crime News | मतदानासाठी रस्त्यावर उतरलेले लोक, कडक पोलीस बंदोबस्तामुळे गुन्हेगारी
‘निरंक’ ! किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत तर गुन्ह्यांमध्येही मोठी घट

You may have missed