Maharashtra Assembly Election 2024 | बाळासाहेब थोरातांचे अजित पवारांना प्रत्युत्तर म्हणाले- “तुमचा बेभान खर्च कमी केला तर आमच्या योजना राबवता येतील”

Ajit-Pawar-thorat

पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार प्रचार सुरु आहे. महायुती सत्ता टिकवून ठेवण्यासाठी लढणार आहे तर महाविकास आघाडी सत्ता उलथवून टाकण्यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान दोन्ही बाजूनी प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. (Balasaheb Thorat On Ajit Pawar)

‘आघाडीने आश्वासन दिलेल्या योजनांचा खर्च कुठून करणार’, असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला होता. त्याला आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘महायुती सरकारने केलेला बेभान खर्च कमी केला तरी आम्ही जाहीर केलेल्या योजना सहज राबवता येतील’, म्हणत थोरात यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, ” मागील अडीच वर्षात युती सरकारने बेभान खर्च केला. लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातींवर जो खर्च केला तो योजनेपेक्षा जास्त आहे. ‘सरकार आपल्या दारी’चा प्रचार करण्यासाठी करोडो रूपये खर्च केले.

युतीच्या आमदारांना जो विकास निधी दिला गेला तोही करोडो रूपयांच्या घरात आहे. राज्याची सगळी आर्थिक शिस्त त्यांनी बिघडवली. हा खर्च कमी केला की आम्ही जाहीरनाम्यात दिलेल्या सर्व योजना सहज राबवता येतील”, असे थोरात यांनी म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!

Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ – सुप्रिया सुळे (Video)

You may have missed