Maharashtra Assembly Election 2024 | बंडखोर उमेदवारांबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय; रमेश चेन्निथला म्हणाले – ‘मविआमध्ये कुठलीही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही त्यामुळे… ‘

Ramesh Chennithala

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत (दि.२९) जागावाटपाचा तिढा सुटलेला नव्हता. तसेच अनेक नेते नाराज होते. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. त्यात काँग्रेसकडूनही अनेक ठिकाणी बंडखोरी समोर आली.

त्यामुळे आता महाविकास आघाडीमधील मतभेद मिटवून ऐक्य टिकवण्यासाठी काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीमध्ये कुठलीही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही. पक्षाच्या अधिकृत उमेदवारीशिवाय ज्यांनी कुठे उमेदवारी अर्ज भरले असतील त्यांनी ते मागे घेतले पाहिजेत, असे स्पष्ट आदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी काँग्रेसच्या बंडखोरांना दिले आहेत.

रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) म्हणाले, ” आमच्याकडून जे कुणी बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचे अर्ज मागे घेण्यात येतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही केवळ हायकमांडने घोषित केलेल्या उमेदवारांनाच एबी फॉर्म दिला आहे. अन्य कुणाला एबी फॉर्म दिलेला नाही. काँग्रेसच्या हायकमांडने उमेदवारी जाहीर केलेल्या उमेदवारांचाच प्रचार करा, असं आवाहन मी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना करत आहे.

त्याशिवाय ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले पाहिजेत.
महाविकास आघाडीमध्ये कुठलीही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही.
जिथे कुठे मतभेद असतील ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह बाळासाहेब थोरात,
विजय वडेट्टीवार आणि वर्षा गायकवाड हे नेते सोडवण्याचे प्रयत्न करतील, असे चेन्निथला यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chinchwad Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल; वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

Katraj Pune Crime News | कात्रजमध्ये गुंडांचा हैदोस ! तरुणांना मारहाण करुन रिक्षा, कारच्या काचा फोडून माजवली दहशत

Maharashtra Assembly Election 2024 | केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने कमविले किमान 43 लाख 62 हजार रुपये जादा

You may have missed