Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत भाजपच ‘दादा’; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 40 जागात गुंडाळणार?

Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. या निवडणुकीदरम्यान योग्यवेळी जागावाटप न झाल्याने हा फटका बसल्याचे जाणकार सांगत आहेत. आता ही चूक टाळण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने (Mahayuti) आतापासूनच जागावाटपाची चर्चा सुरु केलेली आहे. महायुतीत भाजप (BJP), शिवसेना शिंदे गट (Shivsena Eknath Shinde) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा (Ajit Pawar NCP) समावेश आहे.

येत्या दोन तीन महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून रणनीती आखली जात आहे. महायुतीमध्ये भाजपाचेच वर्चस्व राहणार असून ते २८८ पैकी १५०-१६० हुन अधिक जागा लढण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेना शिंदे गटाला ८०-९० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४० जागांच्या आतच गुंडाळले जाणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या पक्षांना मिळाव्यात, असा दावा तिन्ही पक्षांतील आमदारांचा आहे. त्या जागांवरील विद्यमान आमदारांनाच संधी द्यायची की दुसऱ्याला तिकीट द्यायचं हा निर्णय त्या पक्षाचा असेल. पण राज्य भाजपच्या नेत्यांची जागावाटपातील आकड्याबद्दलची भूमिका स्पष्ट आहे. १६० च्या खाली एकही कमी जागा लढवायची नाही, अशी भूमिका दिल्लीतील नेत्यांना कळवण्यात आल्याची माहिती आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)
यांनी पक्षाला महायुतीतून किमान ८० जागा मिळायला हव्या अशी मागणी केली आहे.
त्यामुळे आगामी काळात महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब कसे होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
लोकसभेला कमी जागा घेतल्या. आता विधानसभेलाही तेच होणार असेल तर स्वबळावर लढू,
अशी कुजबुज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar On Pink Colour Dress Jacket | पिंक पॉलिटिक्स वर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; गुलाबी रंगाच्या जॅकेटबाबत म्हणाले,… (Video)

Sharad Pawar NCP | ‘ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे’ अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके
यांच्या भेटीनंतर शरद पवारांचे सूचक वक्तव्य चर्चेत

Dandekar Pool Pune Crime News | पुणे: अल्पवयीन मुलीकडे लग्नाची मागणी करुन असभ्य वर्तन, 40 वर्षीय नराधमाला अटक