Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभेच्या फटक्याने आता विधानसभेला भाजपची सावध पावलं; रणनीती आखत राज्यात अमित शहांकडून बैठकांचा धडाका

Amit Shah

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आता भाजपने आगामी विधानसभेसाठी रणनीती आखत तयारी सुरु केली आहे. लोकसभेला जागावाटप उशिरा झाल्याने फटका बसल्याची चर्चा होती. त्यामुळे आता आगामी निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी केली आहे.

https://www.instagram.com/p/DAYqPO6J2Bi

दरम्यान, अमित शहा यांचे महाराष्ट्रात दौरे वाढलेले आहेत (Amit Shah Maharashtra Tour). बैठकांवर बैठका होत आहेत. शहा यांनी दौऱ्यात निवडणुकीची रणनीती मांडताना आपल्याला शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना रोखायचे आहे, अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच आपल्याला उद्धव ठाकरे, शरद पवारांचे राजकारण संपवायचे आहे, असेही त्यांनी म्हटले. यानंतर आता शहा यांनी मुंबई लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे.

https://www.instagram.com/p/DAYipUsiv4g

अमित शहा स्वतः मुंबईतील डेंजर झोनमधील मतदारासंघांचा विभागनिहाय आढावा घेणार आहेत. तसेच ते मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधणार आहेत. अमित शहांच्या दौऱ्यामुळे मुंबई भाजप अलर्ट मोडवर आल्याचे दिसून येते. पुढील तीन दिवस मतदारसंघ पिंजून काढण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.

https://www.instagram.com/p/DAYhXKbiNmu

पुढच्या तीन दिवसात मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा एक रिपोर्ट तयार केला जाणार आहे. हा रिपोर्ट अमित शहा यांच्याकडे सादर केला जाणार आहे. यामुळे ज्यांची कामगिरी समाधानकारक नाही त्या आमदारांचे टेन्शन वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

https://www.instagram.com/p/DAYa_mjpLlB

राज्यात भाजपचे पूर्ण बहुमत आणायचे असेल तर विरोधकांची मूळ कमकुवत करा. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांना भाजपशी जोडा, असे त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन केले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

https://www.instagram.com/p/DAYZ1KKTQVz

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Viman Nagar Pune Crime News | प्रवासादरम्यान माझ्याजवळ झोप असे म्हणत बसचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्‍यास पोलिसांनी केली अटक

Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’

You may have missed