Maharashtra Assembly Election 2024 | पुण्यातील विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पंकजा मुंडेंकडे; आमदार निवडून आणण्याचे आव्हान

Pankaja Munde

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभेला महायुतीला (Mahayuti) राज्यात मोठा फटका बसला. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे राज्यात मोठे नुकसान झाले आहे. खासदारांची संख्या २३ वरून ९ वर आली आहे. भाजपचे आमदार असणाऱ्या अनेक विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना लोकसभेत चांगले मताधिक्य मिळाल्याने आमदारांसह नेत्यांचीही चिंता वाढली आहे.

दरम्यान आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रणनीती आखली आहे. निवडणुकीची तयारी भाजपने सुरु केली असून, पुणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या ६ विधानसभा मतदारसंघाची जबाबादारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर सोपविण्यात आली आहे. विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुण्यात काय होणार याचा अहवाल प्रदेश भाजपकडे सादर करणार आहेत.

भाजपच्या प्रदेश अधिवेशनात विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता स्थापन होईल असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. पण त्यासाठी जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचे आव्हान भाजपपुढे आहे.

यासाठी संघटनात्मक पातळीवर भाजपने काम सुरु केले आहे. यासाठी भाजपने प्रत्येक लोकसभा मतदारसंघात दोन नेत्यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे प्रत्येकी तीन मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. या बैठकांमध्ये भाजपची बुथनिहाय स्थिती काय आहे?, लोकसभा निवडणुकीत कोणत्या बुथवर किती मताधिक्य मिळाले, कुठे पिछाडी होती, त्यामागची कारणे काय आहेत याचा आढावा घेण्यात आला. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे काय आहे हे जाणून घेऊन त्याचा अहवाल प्रदेश भाजपकडे सादर करणे अपेक्षित आहे.

त्यावरून विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली जाणार आहे. दरम्यान मोहोळ यांनी घेतलेल्या बैठकीत कसबा आणि पर्वतीमध्ये जे मताधिक्य मिळाले त्यावर विसंबून राहू नका, आपण हवेत राहिल्यास त्याचा फटका बसू शकतो. आत्तापासूनच सतर्क रहा, व्यवस्थित नियोजन करा लोकसभा निवडणुकीत आपली ऐनवेळी पळापळ झाली होती अशा शब्दात कान टोचल्याचे भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे लोकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे कसबा,
पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेची जबाबदारी दिली आहे. तर पंकजा मुंडे यांच्याकडे शिवाजीनगर,
वडगाव शेरी, कोथरूड या मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे.
तर बारामतीमधील खडकवासला विधानसभा मतदारसंघही मुंडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
मोहोळ यांनी कसबा आणि पर्वती विधानसभा मतदारसंघाची बैठक घेतली आहे.
तर मुंडे यांच्या बैठका पुढील काही दिवसात होणार आहेत.

” प्रदेश भाजपने पुणे लोकसभेतील मतदारसंघाची जबाबदारी मुरलीधर मोहोळ आणि पंकजा मुंडे यांच्याकडे दिली आहे.
त्यानुसार मोहोळ यांनी कसबा व पर्वती या दोन मतदारसंघाची बैठक घेतली आहे.
या दोन्ही नेत्यांचे प्रवास पुढील काही दिवसात पूर्ण होतील “,
अशी माहिती भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil | बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीला गाडीवर पाहून पतीने मित्राची केली भर रस्त्यात धुलाई; कारण मात्र होते वेगळेच

Pune Ganeshotsav | गणेश मंडळाला 100 वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई; ढोल-ताशा पथकावरही निर्बंध

Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

You may have missed