Maharashtra Assembly Election 2024 | अब्दुल सत्तारांविरोधात लढण्यासाठी भाजप नेते मशाल हाती घेणार; मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

सिल्लोड: Maharashtra Assembly Election 2024 | सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघ (Sillod Assembly Constituency) हा एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. अब्दुल सत्तार यांनी या मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून येत आमदारकीची हॅक्ट्रिक केली आहे. तसेच या विधानसभेतही विजय व्हावा यासाठी सत्तार तयारीला लागले होते.
मात्र यंदाची विधानसभा निवडणूक सत्तार यांच्यासाठी सोपी मानली जात नाही. कारण भाजपचेच प्रदेश चिटणीस सुरेश बनकर (Suresh Bankar) हे आज मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधणार आहेत. त्यामुळे सिल्लोडमध्ये भाजपला मोठी खिंडार पडणार आहे. (BJP News)
मागील १५ वर्षांपासून या मतदारसंघावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. स्थानिक भाजपचे पदाधिकारी, नेते विरुद्ध अब्दुल सत्तार (Abdul Sattar) असा संघर्ष गेल्या काही महिन्यांपासून वाढला आहे. अशामध्ये युती असल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे भाजपचे वरिष्ठ नेते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
आता एकेक पदाधिकारी शिवसेना उद्धव ठाकरे गटात सहभागी होणार अशी चर्चा आहे. सिल्लोड सोयगाव मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असून अब्दुल सत्तारांच्या मित्र पक्षाकडूनच अडचणी वाढणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत वादंग! ‘काँग्रेसमधून उमेदवार आयात करू नका’,
भाजपचा शिवसेना शिंदे गटाला इशारा
Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंकडून पुण्यातील इच्छुक उमेदवारांना समज;
म्हणाले – ‘पक्ष ज्याला उमेदवारी देईल…’