Maharashtra Assembly Election 2024 | 85 जागा खात्रीच्या; भाजपला 25 जागांबाबत चिंता; विधानसभेच्या तयारीला वेग

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभेला फटका बसल्यानंतर आता विधानसभेसाठी रणनीती आखत भाजपने तयारी सुरु केलेली आहे (BJP Strategy For MH Election 2024). लोकसभेला भाजपाला मतदारांनी नाकारले. तेच चित्र विधानसभेला दिसू नये म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने याची दखल घेत राज्यात राजकीय वातावरणाचा आणि जनतेचा कौल लक्षात घेण्यासाठी परराज्यातील नेते महाराष्ट्रात पाठवले आहेत. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून उमेदवार ठरवण्यासाठी त्याची मदत होणार आहे.
भाजपचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव (Bhupender Yadav) यांनी महाराष्ट्रात विशेष जबाबदारी देण्यात आलेल्या गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणामधील बड्या नेत्यांची चार तासांची बैठक सोमवारी घेतली. यावेळी सर्व नेत्यांना पुढील जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. (Mahayuti News)
विधानसभा निवडणुकीत जिंकण्याचा विश्वास असलेल्या ८५ जागा भाजपने काढल्या असून त्यावर लक्ष केंद्रित करताना गेल्यावेळी जिंकलेल्यांपैकी २५ जागांवर यावेळी अधिक मेहनत करावी लागणार असल्याचा सूर पक्षाच्या बैठकांमध्ये व्यक्त होत आहे. विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत भाजपने १०५ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजप-शिवसेना अशी युती होती.
२०१४ च्या तुलनेत पक्षाच्या १७ जागा कमी झाल्या होत्या. सर्वाधिक फटका विदर्भात बसला होता. यावेळी भाजप-संघाच्या तसेच केवळ भाजपच्या ज्या बैठकी सुरू आहेत त्यात निवडून येण्याच्या शक्यतेच्या आधारे ए, बी आणि सी अशा तीन कॅटेगरी करण्यात आल्या आहेत.
२०१४, २०१९ ची विधानसभा निवडणूक आणि २०१४ पासूनच्या तीन लोकसभा निवडणुकांत भाजपला बूथनिहाय झालेले मतदान आणि यावेळी किती मते मिळू शकतात याचा अंदाज या आधारे या कॅटेगरी निश्चित करण्यात आल्या आहेत.
गेल्या वेळच्या १०५ पैकी किमान २५ जागा अशा आहेत, की ज्या जिंकण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल, असे भाजप पक्षसंघटनेत वरिष्ठ पदावर असलेल्यांना वाटते.
ज्या ८५ जागांवर जिंकण्याचा विश्वास आहे, त्या सर्वच गेल्यावेळी जिंकलेल्या आहेत असे नाही.
त्यातही पाच-सात जागा यावेळी धोक्यात आहेत. पण गेल्यावेळी हरलेल्या पाच- सात जागा यावेळी जिंकता येऊ शकतात,
असा फीडबॅक पक्षसंघटनेत महत्त्वाच्या पदांवर असलेल्यांनी दिला.
गेल्या वेळी ज्या जागा कमी फरकाने जिंकल्या होत्या त्या जागाही भाजपने धोक्याच्या मानल्या आहेत.
महायुतीमध्ये भाजप १५५ ते १६० जागा लढण्याची शक्यता आहे.
त्यातील १२५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले असल्याची माहिती आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात
Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”
Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली