Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणूक जिंकण्याची स्ट्रॅटेजी; राणे, मुंडे, शेलार या नेत्यांवर भाजपची मोठी जबाबदारी; फडणवीस रणनीती ठरवणार

BJP

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | मागील लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला. महायुतीला अवघ्या १७ जागांवर समाधान मानावे लागले. भारतीय जनता पक्षाला Bharatiya Janata Party (BJP) अवघ्या नऊ जागा मिळाल्या. दरम्यान आता आगामी निवडणुकीसाठी भाजपाकडून मायक्रो लेव्हलवर तयारी करण्यात येत आहे.

या दृष्टीनेच विधानसभा निवडणुकीसाठी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात येणार आहे.

राज्यातील मराठा समाजासह ओबीसी, आदिवासी, दलित, या समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजपची वेगळी रणनीती असणार आहे. त्यासाठी फडणवीस यांच्यासह हे तीनही नेते राज्यात दौरे करणार आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचे दौरे,
कार्यक्रम सुरु असताना भाजपा शांत दिसत होता. मात्र सप्टेंबरमध्ये हे चारही नेते महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.
त्यानंतर विधानसभा निवडणूक जिंकण्याची स्ट्रॅटेजी ठरवली जाणार असल्याची माहिती आहे.

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sunil Tatkare On Mahendra Thorve | आमदार महेंद्र थोरवेंच्या टीकेला तटकरे, अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – “महेंद्र थोरवेला मी मोजत नाही”

Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | “राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष” शिंदे गटाच्या आमदाराची टीका; महायुतीत कलगीतुरा रंगला

You may have missed