Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभेसाठी भाजपची नवी रणनीती; तावडे, मुंडेंसह तीन नेत्यांवर महत्वाची जबाबदारी
मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून जोरात तयारी सुरु करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्राउंड लेव्हल वरील कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
तसेच नेते आणि कार्यकर्ते यांच्यातील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पक्षातील जेष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संवाद साधला जाणार आहे. त्यातून कार्यकर्त्यांची नाराजी, जागावाटपाबाबत असलेली चिंता यासारख्या विविध समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे.
भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade), राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे (Pankaja Munde), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrakant Patil), मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar), माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची टीम तयार केली आहे. ही टीम सप्टेंबर ५ पर्यंत किमान नऊ ते दहा मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांना भेटणार आहे.
प्रत्येक टीम त्यांचा रिपोर्ट पक्षाचे प्रभारी भूपेंद्र यादव, राष्ट्रीय संयुक्त संघटना सचिव शिवप्रकाश यांना सोपवणार आहे. ज्येष्ठ नेत्यांची टीम राज्यभरात जाणार असून त्यात विनोद तावडे यांना पश्चिम महाराष्ट्र तर आशिष शेलारांना कोकणाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
पहिल्या टप्प्यात हे नेते कार्यकर्त्यांच्या तक्रारी, स्थानिक समस्या जाणून घेतील.
त्याशिवाय विरोधी पक्षाकडून होणाऱ्या नॅरेटिव्हचा आणि सोशल मीडियावर त्यांच्याकडून मांडल्या
जाणाऱ्या मुद्द्यांचा अभ्यास करतील असंही एका नेत्याने सांगितले.
महाविकास आघाडीकडून सातत्याने महायुतीविरोधात आंदोलन पुकारण्यात येत आहे.
त्यात राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे, बदलापूर येथील लैंगिक अत्याचार,
सरकारकडून विविध प्रकल्पात होणारा भ्रष्टाचार हे सर्व मुद्दे प्रामुख्याने मांडण्यात येत आहेत.
त्यातच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा, जातीय विभागणी,
आरक्षण आंदोलन या सर्व गोष्टी चिंतेच्या विषय असल्याचे भाजपा कार्यकर्त्यांना वाटते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा