Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा; दिल्ली दरबारी खलबतं; विधानसभेला चित्र काय असणार?

Ajit-Pawar-Eknath-Shinde-Devendra-Fadnavis

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभेवरून महायुतीत (Mahayuti) सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरु आहे. महायुतीत तीनही पक्षांनी मोर्चेबांधणी करत जोरदार तयारी सुरु केली आहे. महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला नसला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेला सामोरे जायचे असे ठरल्याची माहिती आहे.

मात्र विधानसभेनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असतील अशी वक्तव्ये भाजप नेत्यांकडून (BJP Leaders In Maharashtra) केली जात आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बिहार पॅटर्न राबवून विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करावी, असा प्रस्ताव अमित शहांकडे दिला आहे. त्यामुळे महायुतीत वादाला आणखीनच तोंड फुटले आहे.

त्यातच राज्यातील किमान २५ मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत व्हावी अशी मागणी राज्यातील भाजप नेत्यांनी अमित शहा (Amit Shah) यांच्याकडे केल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रस्तावाला अमित शहा सहमती देणार का? तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी यासाठी तयारी दाखवणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

महायुतीत जागावाटपावरून (Mahayuti Seat Sharing Formula) रस्सीखेच सुरु आहे. एकाच मतदारसंघात घटकपक्षाचे एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार असल्याने तेथे बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महायुतीची आणखीनच डोकेदुखी वाढली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahin Yojana) महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे. अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या दरम्यान प्रसार करताना मुख्यमंत्री’ हा शब्द लागल्याने शिंदे गटाच्या नेत्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आक्षेप घेतला होता. महायुतीतील मित्र पक्षातील नेत्यांकडून अजित पवारांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर असताना या बाबी त्यांच्या कानावर पडल्या. यावर शहांनी आगामी निवडणुका एकसंधपणे लढणार असल्याचे सांगितले. तसेच महायुतीतील वाद चव्हाट्यावर आणू नका अशा सूचनाही दिल्याची माहिती आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत १६० जागांवर भाजपचा दावा आहे तर १२८ जागा शिंदे गट आणि अजित पवार गटाला ठेवण्याची तयारी असल्याचे बोलले जात आहे.

महायुतीत प्रमुख पक्षातील नेते राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघावर दावे करु लागले आहेत. त्यामुळे महायुतीतील नेत्यांमध्ये ताणतणाव पाहायला मिळत आहे. तर महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देखील ठरला नसल्याची माहिती आहे. तर लाडकी बहीण योजनेवरूनही महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याची चर्चा आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचं भाष्य केले आहे.

‘मुख्यमंत्री हा प्रमुख असून तो टीमचा कॅप्टन असतो. सगळे सुज्ञ असून आम्ही श्रेयवादात पडत नाही. आम्ही महायुती म्हणून काम करतोय. मी योजनेचं श्रेय माझ्या बहिणींना देतो’. देवेंद्र फडणवीस यांनीही या वक्तव्याला दुजोरा दिला. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर आगामी विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात लढल्या जाण्याची शक्यता अधिक आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed