Maharashtra Assembly Election 2024 | येत्या 10-15 दिवसात राज्यात आचारसंहिता? गणेशोत्सवानंतर आता राजकीय हालचालींना वेग; महायुती, महाविकास आघाडीकडून जागावाटपावरून बैठकांचा धडाका

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात निवडणूक होईल, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत. तर येत्या १०-१५ दिवसात राज्यात आचारसंहिता लागेल, असं भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हंटले आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) जागावाटपावरून (Mahayuti Seat Sharing Formula) चर्चा सुरु झाल्या आहेत.
गणेशोत्सव संपल्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. उद्यापासून सलग ३ दिवस महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची जागावाटपावर बैठक होणार आहे.
याबाबत संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “काँग्रेस पक्ष सध्या व्यस्त आहे तरीही जागावाटपाचा लवकर तोडगा काढला पाहिजे. काँग्रेस नेत्यांना (Maharashtra Congress Leader) आम्ही बैठकीचे आमंत्रण दिले आहे. ते इतके व्यस्त आहेत त्यामुळे तारखावर तारखा देत आहेत. त्यामुळे आज आम्ही ठरवलंय, काहीही झालं तरी आजपासून ३ दिवस आम्ही चर्चा करू”, असं राऊत यांनी म्हटलं.
दुसरीकडे महायुतीकडून पुढील दोन दिवसानंतर जागावाटपावर बैठका सुरू होत आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची पहिली बैठक होईल. या बैठकीत भाजपा (BJP), शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP AP) किती जागा लढवणार याचा निर्णय अपेक्षित आहे.
त्यानंतर येत्या ८ दिवसांत काही उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे बैठकांना वेग आला आहे. युतीबाबत वरिष्ठ नेते चर्चा करतील आणि घोषणाही करतील, अशी माहिती शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Sirsat) यांनी दिली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा