Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसचा पुण्यातील 5 मतदारसंघावर दावा; 14 इच्छुकांचे अर्ज दाखल

congress

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पाच विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. दरम्यान शहरातील ८ जागांसाठी १४ इच्छुकांनी आतापर्यंत पक्षाकडे अर्ज केले आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणूकही महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) माध्यमातून एकत्रित लढवण्याचा निर्णय तिन्ही पक्षांनी घेतला आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. परंतु आघाडीतील तिन्ही पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष (Sharad Pawar NCP) आणि शिवसेना उद्धव ठाकरे (Shivsena UBT) पक्ष यांनी यापूर्वी शहरातील सर्व जागांवर दावा केला आहे. या पाठोपाठ काँग्रेसने आता शहरातील आठपैकी पाच विधानसभा मतदारसंघांवर दावा केला आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (ता. ९) साप्ताहिक बैठक झाली. त्यामध्ये पाच जागांवर दावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कसबा विधानसभा (Kasba Assembly) मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार आहे. तर मागील विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगर (Shivaji Nagar Assembly) आणि पुणे कॅन्टोन्मेंट (Pune Cantonment Assembly) या दोन्ही मतदारसंघांत पक्षाच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला होता.

त्यामुळे या तिन्ही मतदारसंघाबरोबरच पर्वती (Parvati Assembly) आणि हडपसर (Hadapsar Assembly)
या दोन्ही मतदारसंघावरही दावा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती मिळत आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांकडून पक्षाने अर्ज मागविले होते.
आतापर्यंत पक्षाकडे १४ जणांनी अर्ज केले आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात बेकायदा पिस्तूल मित्राला दाखवताना गोळीबार, एक जखमी

Mumbai Police Constable Wife Suicide | हुंड्यासाठी पोलीस पतीचे टोमणे, हळद उतरण्यापूर्वीच पत्नीने आयुष्य संपवलं!

Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड

You may have missed