Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडे पुण्यातील 8 मतदारसंघातून 24 इच्छुकांचे अर्ज; काँग्रेसची महत्वकांक्षा वाढली
पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झालेली आहे. दरम्यान पक्षश्रेष्ठींकडून इच्छुकांचे अर्ज मागवण्यात येत आहेत. पुण्यातील ८ मतदारसंघातून २४ इच्छुकांचे अर्ज काँग्रेसकडे (Congress Candidates From Pune) प्राप्त झालेले आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी एका जागेसाठी २० अर्ज आले होते. त्यावेळी काँग्रेसने अर्ज करणाऱ्यांकडून कोणतीही रक्कम घेतली नव्हती. याच अर्जातून रवींद्र धंगेकर यांची निवड करून काँग्रेसने उमेदवारी घोषित केली होती.
मात्र विधानसभेसाठी इच्छुकांचे अर्ज मागवताना शुल्क आकारण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गासाठी २० हजार तर महिला आणि आरक्षित प्रवर्गासाठी १० हजारांची रक्कम घेण्यात आली आहे. त्यामुळेच लोकसभा अर्जाच्या तुलनेत यावेळी अर्जांची संख्या कमी आहे.
आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे सांगितले जात असले तरी काँग्रेसने २८८ मतदारसंघात तयारी सुरु केलेली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे काँग्रेसच्या महत्वकांक्षा वाढल्या आहेत. जागावाटपात अपेक्षित जागा न मिळाल्यास किंवा ऐनवेळी ‘एकला चलो रे’ ची भूमिका घ्यावी लागल्यास आपली तयारी असावी, या दृष्टिकोनातून काँग्रेसकडून चाचपणी करण्यात येत असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
पुणे शहरातील आठ विधानसभा जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने (Sharad Pawar NCP) ६ जागांवर दावा सांगितला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT) देखील ६ जागांवर महाविकास आघाडीकडून विधानसभा लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. काँग्रेसने देखील शिवाजीनगर (Shivaji Nagar Assembly), पुणे कॅन्टोन्मेंट (Pune Cantonment Assembly) आणि कसबा (Kasba Assembly) या जागा आपल्यालाच मिळतील असे जवळपास निश्चित मानले आहे. त्या व्यतिरिक्त एकदोन जागा मिळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असणार आहे.
आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कसबा, शिवाजीनगर, हडपसर (Hadapsar Assembly),
पुणे कॅन्टोन्मेंट, पर्वती (Parvati Assembly), वडगाव शेरी (Vadgaon Sheri Assembly) आणि
कोथरूड (Kothrud Assembly), खडकवासला (Khadakwasla Assembly)
या आठ मतदारसंघांमधून तब्बल २४ इच्छुकांचे अर्ज काँग्रेसला प्राप्त झाले आहेत.
यातूनच तीन किंवा चार काँग्रेस उमेदवार निवडले जाणार आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !
पोस्कोखाली गुन्हा दाखल झाल्याने होता टेन्शनमध्ये