Maharashtra Assembly Election 2024 | ‘महायुतीला 3 अंकी संख्याही गाठता येणार नाही, तर मविआ 183 जागा…”, काँग्रेसच्या बड्या नेत्याचे भाकीत

Congress-BJP

पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु झालेली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते अशी परिस्थिती आहे. नेत्यांचे दौरे वाढले आहेत. इच्छुक उमेदवार ज्या पक्षातून तिकीट मिळेल त्याठिकाणी पक्ष प्रवेश करताना दिसत आहेत. दरम्यान विधानसभेचे चित्र नेमके काय असेल याबाबत विविध दावे केले जात आहेत.

https://www.instagram.com/p/DAz8W8YJ20_

कराड दक्षिण तालुका काँग्रेस कमिटी, पुणे पिंपरी चिंचवड रहिवासी यांच्यातर्फे निगडी प्राधिकरण या ठिकाणी असलेल्या ग.दि. माडगूळकर सभागृहात स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडी १८३ जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. तर महायुतीला तीन अंकी संख्याही गाठता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/DA0Fm32pWQa

पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या. ६५ टक्के जागा आम्ही जिंकलो. या गोष्टीचा विचार केला तर आम्ही विधासभा निवडणुकीत १८३ जागा जिंकू शकतो, महायुतीचा विचार केला तर ते तीन अंकी संख्याही गाठतील की नाही अशी स्थिती आहे.” असं भाकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवले आहे.

https://www.instagram.com/p/DA0NS3KpNqB

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On Dattatray Bharne | ‘इंदापूरातून एका सहकाऱ्याला खूप संधी दिली मात्र….’, शरद पवारांची दत्ता भरणेंवर जहरी टीका; म्हणाले – ‘बारामती अन् इंदापूरात मलिदा गँग…’

Jayant Patil On BJP Govt | हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशाच्या मेळाव्यात जयंत पाटलांनी सगळंच काढलं; म्हणाले – ‘दिल्लीश्वरांकडून शरद पवारांना ईडीची नोटीस, नमवण्याचे आटोकाट प्रयत्न’

Pimpri Assembly Constituency | पिंपरी विधानसभेत लढण्यास इच्छुक; ‘या’ महिला नेत्याने घेतली शरद पवारांची भेट; पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

You may have missed