Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडून 135 जागा लढवण्याचा प्रस्ताव; महाविकास आघाडीत तिढा निर्माण होण्याची शक्यता

Mahavikas-Aghadi

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु झालेली आहे. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेतही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) अशी लढत पाहायला मिळणार आहे. मात्र जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे. (Mahavikas Aghadi Seat Sharing)

उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीतील जागावाटपावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत नेत्यांची बैठक घेतली होती. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला (Congress) मोठे यश मिळाले आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जास्त जागा मिळाव्या अशी काँग्रेसची भूमिका आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने आगामी विधानसभेसाठी कंबर कसली आहे. काँग्रेसने नुकताच २८८ जागांचा सर्व्हे पूर्ण केला असून मविआच्या बैठकीत काँग्रेसने मित्रपक्षांना १३५ जागांचा प्रस्ताव दिला आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

याबाबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) सूचक विधान केले आहे. हा प्रस्ताव शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला (Sharad Pawar NCP) दिला जाणार आहे. त्यानंतर त्यातल्या किती जागा काँग्रेसच्या पारड्यात पडतील हे स्पष्ट होणार आहे.काँग्रेसने नुकत्याच विधानसभेच्या २८८ जागांची चाचपणी केली होती. या जागांसाठी इच्छुकांकडून अर्जही मागवण्यात आले होते. त्याला मोठा प्रतिसादही मिळाला होता.

एका जागेसाठी अनेक इच्छुकांनी अर्ज भरले आहेत.
त्यामुळे जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे.
त्यामुळेच महाविकास आघाडीत १३५ जागा मिळाव्यात अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

मात्र १५३ जागा शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शेकाप आणि अन्य छोटे पक्ष कसे वाटून घेणार का ?
हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने लोकसभेला कमी जागा लढून जास्तीत जास्त जागा जिंकल्या होत्या.

त्यामुळे आता विधानसभेला पवार जागा वाटपात दोन पावलं मागे जाण्याची शक्यता कमीच आहे.
तर ठाकरेंनाही पवारांपेक्षा कमी जागा मान्य होणं कठीण आहे.
त्यामुळे काँग्रेसच्या प्रस्तावावरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण होण्याचीच शक्यता अधिक आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On MPSC Aspirants Protest | “…तर मी मी स्वतः आंदोलनात उतरेल”, शरद पवारांचा राज्य सरकारला इशारा, म्हणाले – “न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार”

Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण

Harshvardhan Patil | शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर हर्षवर्धन पाटलांचे भाष्य; म्हणाले – “लोकांच्या भावना समजून…”

Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे

Suicide In Khadakwasla Dam | सेल्फी काढून नातेवाईकांना पाठवला अन् संपवलं आयुष्य; खडकवासला धरणात उडी मारून तरुणाची आत्महत्या

You may have missed