Maharashtra Assembly Election 2024 | ‘उमेदवार द्यायचा नाही आता कोणाला पाडायचं ते पाडा’, मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; म्हणाले – ‘गनिमी काव्याने समाजाची ताकद दाखवू’
बीड: Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange Patil) आंदोलनाचा लोकसभेत महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांनी उमेदवार देण्याबाबत भाष्य केले होते. तशी त्यांनी तयारीही केली होती. त्यामुळे सर्वपक्षीय नेते मनोज जरांगे यांच्या भेटीला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. विधानसभा निवडणुकीत जरांगे यांची भूमिका महत्वाची ठरेल असे राजकीय विश्लेषक मांडणी करीत होते. (Maharashtra Assembly Election 2024)
दरम्यान, आता मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल (दि.३) कोण- कोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार, याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. तसेच, कोणत्या जागेवरील उमेदवार पाडायचे याबाबतही सांगितले होते. मात्र, आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेत विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.
मनोज जरांगे म्हणाले, ” मित्रपक्षाची यादी आलेली नाही. त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि.४) केले.
ते पुढे म्हणाले, “तुमच्या मतदार संघात तुम्हाला ज्याला मदत करायची त्याच्याकडून
‘मी तुमच्या मागण्यांशी सहमत आहे’ असे लिहून घ्या. मी राजकारणात नाही. मी आणि माझे आंदोलन आहे.
कोणी मला खवळले तर मी त्यांचा खेळ खल्लास करेन.
लोकसभा पॅटर्ननुसार आम्ही आमची भूमिका घेणार आहोत.
सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घ्यावेत. आपण कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा
अपक्षाला पाठिंबा दिलेला नाही. राखीव असो किंवा इतर जागा असोत तेथे आमचा पाठींबा अद्याप
तरी जाहीर केलेला नाही”, असेही जरांगे यांनी म्हंटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा