Maharashtra Assembly Election 2024 | मतदानाच्या अनुषंगाने दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवडणूक प्रशासनाचे आवाहन

Fake

मतदान यादीत नाव नसल्यास नमुना क्र. १७ चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याचा दिशाभूल करणारा संदेश व्हॉट्सॲपवर तसेच समाज माध्यमांवर पसरविला जात आहे

पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | मतदान यादीत नाव नसल्यास नमुना क्र. १७ चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याचा दिशाभूल करणारा संदेश व्हॉट्सॲपवर तसेच समाज माध्यमांवर पसरविला जात असल्याचे निदर्शनास आले असून अशा संदेशांपासून मतदारांनी सावध रहावे, अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.

“मतदार यादीत नाव नसतानाही नावे यादीतून वगळलेली असलेल्या नागरिकांनी मतदान केंद्रावर जावून फॉर्म क्रमांक १७ भरावा. मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करू शकणार ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांनी मतदान केंद्रावर जावून त्वरीत पुढील प्रक्रिया करावी”, असा चुकीचा दिशाभूल करणारा संदेश भ्रमणध्वनीवरून प्रसारित करण्यात येत आहे. मात्र फॉर्म क्रमांक १७ हा दहावी बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी असतो.

तर मतदार यादी मध्ये नाव नोंदणीसाठी फॉर्म क्र. ६ असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही फॉर्मद्वारे मतदान केंद्रावर जावून मतदान करता येत नाही. तरी अशा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये. अशी चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”

You may have missed