Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याची राजकीय पक्षांची मागणी ! केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांचे पथक मुंबईत दाखल

Election-Commission

पुणेरी आवाज – Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकांच्या तारखांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या 14 अधिकाऱ्यांचे पथक गुरूवारी रात्री मुंबईत दाखल झाले. यादरम्यान विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत बहुतांश जणांनी निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याची मागणी केली आहे.

https://www.instagram.com/p/DAaYoyTJ4-S

यासंदर्भात माजी खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी आणि त्यासंदर्भात काही सूचना असल्यास त्याची माहिती घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम तीन दिवसांच्या दौर्यावर मुंबईत दाखल झाली आहे. निवडणूक खर्च 20 लाख रूपयांनी वाढवावा, कारण महागाई वाढली आहे, तसेच सगळ्याच पक्षांनी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. अशी माहिती शेवाळे यांनी दिली.

https://www.instagram.com/p/DAaW8DWpNr6

शनिवारी पत्रकार परिषद होण्याची शक्यता

आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी गुरूवारी रात्री मुंबईत दाखल झालेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांचा तीन दिवसीय दौरा संपल्यानंतर या पथकाचा शनिवारी मुंबईत पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. या अधिकाऱ्यांच्या पथकात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वात धर्मेंद्र शर्मा, नितेश व्यास, मनिष गर्ग (तिघेही वरिष्ठ निवडणूक उपायुक्त), िह्देश कुमार, अजीत कुमार, मनोजकुमार साहो, संजय कुमार (निवडणूक उपायुक्त), एन. एन. बुटोलिया (वरिष्ठ प्रधान सचिव), शुभ्रा सक्सेना, यशवेंद्र सिंग, दीपाली मसिरकर (संचालक), सुमन कुमार दास (सचिव), अनुज चांडक (सहसचिव) आणि अनिलकुमार (अपर सचिव) यांचा समावेश आहे. हे अधिकारी शुक्रवारी विविध प्राधिकरणे, मुंबईसह राज्यातील पोलिस आयुक्त आणि पालिका आयुक्तांसह इतर अधिकार्यांची बैठक घेत आहेत. त्यामुळे दौरा संपल्यावर ते पत्रकार परिषद घेतील अशी शक्यता आहे.

https://www.instagram.com/p/DAaTd4opUq-

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Viman Nagar Pune Crime News | प्रवासादरम्यान माझ्याजवळ झोप असे म्हणत बसचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्‍यास पोलिसांनी केली अटक

Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’

You may have missed