Maharashtra Assembly Election 2024 | ‘महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढती व्हाव्यात’, शिंदे गटाच्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “पक्ष वाचवण्यासाठी … “

Eknath-Shinde-Devendra-Fadnavis-Ajit-Pawar

जालना: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून चर्चा (Mahayuti Seat Sharing Formula), बैठका सुरु आहेत. दरम्यान जागावाटपावरून रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे. असे असतानाच शिंदे गटाचे नेते (Shivsena Shinde Group) आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढती व्हाव्यात असे मोठे विधान केले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

अर्जुन खोतकर म्हणाले, “राज्यामध्ये आम्ही तीन पक्ष लढतो. एखाद्या दुसऱ्या जागेवर किंवा दहा पाच जागेवरती असा प्रसंग येऊ शकतो की जिथे टोकाचा प्रसंग येईल. अशावेळी निर्णय घेणे पक्ष श्रेष्ठींनाही अवघड जाते. अशा स्थितीत आपले कार्यकर्ते इकडे तिकडे जाऊ नये त्यामुळे दोन पाच जागेवरती असा निर्णय झाला तर फार वावग नाही. यापूर्वी अशा मैत्रीपूर्ण लढती झालेल्या आहेत. पक्ष वाचवण्यासाठी असा प्रयत्न सर्वांनाच करावा लागेल”, असे भाष्य अर्जुन खोतकर यांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले, ” एकनाथ शिंदे (Eknath Shinde) येणाऱ्या निवडणुकीचे नेतृत्व करत आहेत त्यामुळे आमची अपेक्षा आहे की जास्त जागा आम्हाला आल्या पाहिजेत. जास्त नाही जर समसमान जागा तरी आल्या पाहिजेत, एवढी आमची मागणी असणार आहे. शेवटी नेते निर्णय घेतील, पण पक्षाचा शिपाई म्हणून ही माझी भावना आहे की आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाल्या पाहिजेत.

राज्यात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की एकट्याच्या बळावर सरकार येणं इतिहास जमा झाले आहे. आम्हाला जेवढी गरज तेवढीच भाजपला आहे आणि राष्ट्रवादीला आहे, सर्वांनी जागा कशा निवडणून येतील त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे”, असेही अर्जुन खोतकर यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed