Maharashtra Assembly Election 2024 | ‘धनंजय मुंडेंनी कमळ घेतलं असतं तर बरं झालं असतं’, प्रचारसभेत पंकजा मुंडेंची फटकेबाजी;, म्हणाल्या – ‘लोकसभेला भावाने प्रचार केला…’

panjaka-munde-dhananjay-munde

बीड: Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी तर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा लढती पाहायला मिळत आहेत. (Pankaja Munde On Dhananjay Munde)

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारसभेत भाजप नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी केलेले भाषण चर्चेत आहे. या सभेत बोलताना “धनंजय मुंडे यांनी कमळच हाती घेतलं असतं तर बरं झालं असतं”, असं विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, ” परळी विधानसभेत आपले कमळ चिन्ह नाही, तुम्ही ते शोधणार आहात हे मला माहिती आहे. म्हणूनच धनंजय मुंडेंनी कमळ घेतलं असतं तर बरं झालं असतं. आता आपल्याला धनंजय मुंडेंना आमदार करायचं आहे.

या देशात अनेक परिवार एकमेव एकमेका विरुद्ध लढत आहेत. राजकारणाची पातळी अनेक जणांनी सोडली आहे. या निवडणुकीत आपण एक आहोत सर्वांना दाखवून द्यायचं आहे. सन्मानाची लढाई असते, पैशाची, सत्तेची नसते.”

त्या पुढे म्हणाल्या, ” परळीमधून २००९ ला आमदार होईल, असं माझ्या मनात कधीही नव्हतं. मी कधीच मुंडे साहेबांचा शब्द खाली टाकला नाही. आमचं घर फुटलं आणि महाराष्ट्र बघत होता. बाबा एकटे पडले म्हणून मी राजकारणात आले.

मी जीवनात काय चांगलं काम करू शकले, मला माहिती नाही. मात्र वाईट काम मी कधीच केलं नाही. मी ज्यावेळेस लोकसभेला उभी राहिली, त्यावेळी माझा भाऊ माझ्यासोबत आला आणि माझा प्रचार केला, मला खूप चांगलं वाटलं”, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Jayant Patil On Vasant More | पुन्हा एकदा वसंत मोरे पक्ष बदलणार? जयंत पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा; म्हणाले – “वसंत मोरे यांच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ”

Shivaji Nagar Assembly Election 2024 | “मनीष आनंद यांच्या माध्यमातून विकासकामे झाली असल्याने आम्ही त्यांच्यासोबत”, शिवाजीनगरमधील नागरिकांचा निर्धार

Maval Assembly Election 2024 | सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट; बापू भेगडेंचे कडवं आव्हान,
मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ

Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!

Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची
भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ –
सुप्रिया सुळे (Video)

You may have missed