Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून महायुतीत जुंपली; जागांवर दावे- प्रतिदावे; नेत्यांच्या आदेशाचे उल्लंघन

Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभेच्या तोंडावर महायुतीतील (Mahayuti) घटकपक्ष एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सातत्याने महायुतीतील वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये मतभेद निर्माण होत आहेत. जागावाटपावरूनही नेते वेगवेगळे दावे करत महायुतीत सर्वकाही आलबेल नाही याचीच प्रचिती करून देत आहेत. (Mahayuti Seat Sharing Formula)

विधानसभेच्या जागावाटपावरून महायुतीतील तीन प्रमुख नेते सोडून कोणीही बोलू नये, असे वारंवार सांगितले जात असतानाही तिन्ही पक्षांकडून या आदेशाचे उल्लंघन करणे सुरूच आहे. जागावाटपावरून दावे करणे महायुतीतील नेते थांबवत नसल्याचे चित्र पुन्हा समोर आले.

बुलढाण्याचे शिंदेसेनेचे (Shivsena Shinde Group) आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी आमचा पक्ष १२० जागा मागेल आणि १०० निवडून आणेल, असे विधान केले. आमच्या पक्षाला इकडे-तिकडे पाहण्याची गरज नाही, आमचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पक्षाला मोठे यश मिळवून देतील, असे ते म्हणाले.

त्यावर, गायकवाड यांचा विश्वास योग्यच आहे, पण जागावाटपाबाबत कोणीही बोलू नये, आम्हाला कोणालाही तो अधिकार नाही. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) काय तो फॉर्म्युला ठरवतील, अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेचे नेते, आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दिली.

त्यावर, शिंदेसेनेचे काय ते तीनशेही जागा निवडून आणतील, पैशाच्या बळावर आम्ही काहीही करू शकतो, असे त्यांना वाटते, असा चिमटा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी काढला.

दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आमच्या पक्षाला ८० ते ८५ जागा मिळायला हव्यात असे मत व्यक्त केले आहे.
अपक्षांसह ६० आमदार आजच आमच्याकडे आहेत. आणखी २०-२५ तरी जागा आम्हाला मिळायला हव्यात.
भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी महायुतीतील मित्रपक्षावर अन्याय होणार नाही, असा शब्द दिल्याचे भुजबळांनी सांगितले.

जागावाटपाचे दावे-प्रतिदावे जाहीरपणे करणे योग्य नाही, तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून ठरवतील,
अशी प्रतिक्रिया यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
महायुतीमध्ये जिथे जो पक्ष निवडून येईल त्याला ती जागा द्यायची असे आमचे ठरले आहे.
कोणताही वाद नाही, लवकरच फॉर्मुला ठरेल असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले. (Maharashtra Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed