Maharashtra Assembly Election 2024 | ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा प्रचार होणार; उद्धव ठाकरेंवर मोठी जबाबदारी

Mahavikas Aghadi-Shivsena UBT

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महायुती आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी मेळावा- बैठकांचा धडाका सुरु केलेला आहे. लोकसभेप्रमाणेच आता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना असणार आहे.

दरम्यान महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी मतदार संघाची चाचपणी सुरु केली आहे. महाविकास आघाडीच्या निवडणुकीची प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडीच्या प्रचार प्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची नियुक्ती केल्याने महायुतीचे टेन्शन वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जातेय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात विधानसभेचा प्रचार होणार आहे. पण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव आताच जाहीर होणार नसल्याची माहिती मिळाली आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण? हे ठरवलं जाणार आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी केलेले काम आणि नेतृत्व यामुळे त्यांच्याच हाती सूत्र देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
काँग्रेसच्या हायकमांडने राज्यातील काँग्रेस (Maharashtra Congress) नेत्यांना माहिती दिली आहे.

तसेच इंडिया आघाडीत (India Aghadi) असणाऱ्या इतर छोट्या पक्षांना देखील आघाडीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न
करण्याच्या सूचना हायकमांडने काँग्रेस नेत्यांना दिल्या आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sinhagad Road Flyover | अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले – ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले असे आमचे सरकार’

Hadapsar Pune News | हडपसर: बहुचर्चित भारतातील सर्वात पहिल्या प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्र्याचा हस्ते होणार उद्घाटन !

Pune ACB Trap Case | महिला सहायक सरकारी वकिल एसीबीच्या जाळ्यात; जप्त कार परत मिळवून देण्यासाठी मागितली लाच

Sri Sri Ravi Shankar | वैचारिक अभिव्यक्ती आणि विविधता हेच भारताला भारत बनवते ! – गुरुदेव श्री श्री रविशंकर

You may have missed